आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: एवढी दारु प्यायली महिला की शुद्धच नव्हती, टॉयलेटमध्ये अडकला पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युलिन (ग्वांग्झू) - चीनमध्ये एका महिलेचा पाय टॉयलेटमध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला प्रचंड दारु प्यायलेली होती. जेव्हा ती बाथरूममध्ये गेली त्यावेळी तिचा पाय एशियन स्टाइल टॉयलेटमध्ये अडकला. सुरुवातीला तिने पाय काढण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य झाले नाही. अखेर फायरफायटर्सच्या टीमने महिलेला सोडवले. 


मोठ्याने रडत होती महिला 
- सकाळी सुमारे साडे तीन वाजता महिलेच्या फॅमिलीने इमर्जन्सी सर्व्हीसेसला कॉल केला. जेव्हा रेस्क्यू टीम त्याठिकाणी पोहोचली तेव्हा महिला मोठ्याने रडत होती. तिचा उडवा पाय टॉयलेटमध्ये अडकला होता. 
- सुरुवातीला फायरफायटर्सने महिलेच्या पायावर शॅम्पू आणि बॉडी वॉश टाकून पाय काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर टॉयलेट तोडून महिलेचा पाय बाहेर काढण्यात आला. तिला किरकोळ जखम झाली. दारु प्यायल्यानंतर कधीही एशियन स्टाइलचे टॉयलेट वापरणार नाही असे तरुणीने ठरवले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...