आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को - रशियात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठीचे मतदान रविवारपासून घेतले जाणार आहेत. त्याच्या 5 दिवसांपूर्वीच काही भागांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यापैकीच एक मॉस्कोपासून 1500 किमी दूर सायबेरियात उणे 40 अंश सेल्सियस तापमानात लोक थंडीची परवा करत नाहीत. ते आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर जात आहेत. बाहेरून येणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मात्र हेलिकॉप्टर आणताना त्रास झाला.
- रशियन प्रांत सायबेरियात फेब्रुवारीपासून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या रविवारीच नेनेत्स या ऑटोनॉमस शहरात लोकांनी मतदान केले.
- क्रेमलिनच्या राजकारणापासून दूर नेनेत्स राजधानी मास्कोपासून 1570 किमी अंतरावर आहे. येथे तापमान -40 अंश सेल्सियस पर्यंत घसरले आहे.
- संपूर्ण शहर बर्फाने झाकलेले असून तेथे रस्त्याचा नामोनिशाणही नाही. तरीही निवडणूक आयोगाने येथील लोकांना मतदानासाठी तयार करून दोन आठवड्यात मतदान आटोपण्याचा निर्णय घेतला.
- खराब हवामान आणि बर्फवृष्टीतही निवडणूक आयोगाचे अधिकारी हेलिकॉप्टरने 400 किमींचा प्रवास करून येथील स्थानिकांच्या भेटी घेण्यासाठी आले.
- या प्रांतात इतकी थंडी असते हवेत गरम पाणी फेकल्यास जमीनीवर बर्फ होऊन पडेल. येथील लोक जीवनावश्यक काम सोडून कुठल्याही कामानिमित्त घराबाहेर पडत नाहीत. तेच लोक मतदानाचे महत्व लक्षात घेऊन बाहेर पडत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रक्त गोठवणाऱ्या थंडीत मतदानासाठी बाहेर पडताना लोक...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.