आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी चौथ्यांदा निवड झाली आहे. ते 2000 पासून आतापर्यंत 18 वर्षे रशियाचे नेते आहेत. पुतिन जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता भोगणारे नेते ठरले. त्या निमित्त आम्ही पुतिन यांच्याविषयी चर्चेत असलेल्या काही महत्वाच्या गोष्टी घेऊन आलो आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी माध्यमांमध्ये क्वचितच वृत्त दिले जाते. त्यांच्या कुटुंबावर रशियाचे स्थानिक माध्यम सुद्धा चर्चा करत नाहीत.
पुतिन यांचे मोठे बंधू दुसऱ्या महायुद्धात रशियाकडून लढताना मृत्यूमुखी पडले होते. एका सामान्य घरातून येणारे पुतिन रशियन गुप्तचर संस्था केजीबीत गुप्तहेर होते. त्यांच्या कामगिरीवरून तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष येल्तसिन एवढे खूश झाले, की त्यांनी पुतिन यांना आपला राजकीय वारसदार घोषित केले.
जगातील सर्वात स्टायलिश नेत्यांपैकी एक पुतिन यांचा रशियात मोठा चाहता वर्ग आहे. रशियात पुतिन यांना हिरो म्हटले जाते. इंटरनेट आणि सोशल मीडियावर फॅन्सने पुतिन यांच्या कारनाम्यांच्या एवढ्या अफवा पसरवल्या की ते आजकाल लोकांना खऱ्याच वाटतात. त्यापैकीच एक म्हणजे, पुतिन अजरामर आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक क्रॉप केलेला फोटो प्रचंड गाजला. त्यामध्ये तीन फोटो लावण्यात आले आहेत. एकामध्ये कथितरीत्या पुतिन 1920 च्या काळात लष्करी पोशाखात, दुसऱ्या महायुद्धात 1941 च्या एका फोटोमध्ये आणि त्यांचा सध्याचा एक फोटो दिसतो. एकूणच हे फोटोज दाखवून पुतिन अमर आहेत असे म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टायलिश राष्ट्राध्यक्षाचे आणखी काही फॅक्ट्स...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.