आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांसमोर आले अन् रडूच कोसळले.. या प्रेमाला उपमाच नाही.. काळजाला हात घालेल हा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. एवढे की जगात दुसरे कोणीही करणार नाही एवढे. उदरनिर्वाहासाठी लोकांसाठी सादरीकरण करायचे. ज्यावेळी त्यांचे ब्रेकअप झाले त्यावेळी त्याला अविस्मरणीय बनवायचे असा निर्णय दोघांनी घेतला. दोघे चीनच्या ग्रेट वॉल ऑफ चायनावर गेले. दोन टोकांपासून दोघांनी एकमेकांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. एकदा अखेरच्यावेळी भेटून एकमेकांना मिठी मारली आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर जेव्हा दोघे एकमेकांना भेटले तेव्हाचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने सर्व प्रेमींसाठी आदर्श ठरला.

 

विभक्त झाल्यानंतर दोघांचेही जीवन सामान्यपणे सुरू राहिले. नंतर ते एकमेकांना भेटलेही नाहीत. पुढे या जोडप्यातील प्रेयसी मोठी सेलिब्रिटी बनली. मरिना अब्रामोव्हीक असे तिचे नाव आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव उले असे आहे. उलेही चांगला संगीतकार बनला. सेलिब्रिटी बनलेली मरिना 2010 मध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिला काही अनोळखी व्यक्तींबरोबर प्रत्येकी एक मिनिट केवळ शांत बसून घालवायचा होता. एका पाठोपाठ एक लोक तिच्यासमोर येऊन बसत होते, आणि एक मिनिट बसून जात होते. यादरम्यान अचानक उले तिच्यासमोर येऊन बसला. त्यानंतर या दोघांच्या भावनांचा बांधच फुटला. 30 वर्षांनी एकमेकांना भेटलेले हे दोघे प्रेमी एकमेकांकडे पाहत होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावनाच दोघांच्या डोळ्यामधून वाहत होत्या. काही वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एवढा इमोशनल आहे की, जीवनात ज्याला प्रेम झाले असेल, त्याच्या डोळ्यात हा व्हिडीओ पाहून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जाणून घेऊ काय झाले या जोडप्याच्या तीस वर्षांनंतरच्या भेटीमध्ये...

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांच्या ३० वर्षांनंतरच्या भेटीचे PHOTO आणी ही स्टोरी अखेरच्या स्लाइडवर पाहा Video

बातम्या आणखी आहेत...