आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्स हॅरी-मेघन मार्कलचा शाही विवाह आज, पाहुण्यांना पाळावे लागतील 7 नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या शाही घराण्याचे प्रिन्स हॅरी यांचा हॉलिवुड अभिनेत्री मेघन मार्कल हिच्याशी 19 मे रोजी शाही विवाह सोहळा आहे. लग्नाच्या सेरमेनीसाठी ब्रिटनच्या विन्डसर कासल चर्चची निवड करण्यात आली. या विवाह सोहळ्यात जगभरातून 600 जणांना इनव्हाइट करण्यात आले आहे. त्या सर्वांना शाही विवाहात सभ्य पाहुण्याप्रमाणे वागण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेतच अशा 7 अटींचा उल्लेख करण्यात आला आहे. 


फोन-कॅमेरे बॅन, 3 किमी पायी चालावे लागेल...
1. फोन आणि कॅमरे बॅन

शाही विवाह सोहळा पूर्णपणे एक खासगी कार्यक्रम आहे. त्यामुळे, लग्नात फोटोग्राफीसाठी फक्त एक अधिकृत फोटोग्राफर उपस्थित राहील. त्यालाच फोटो क्लिक करण्याचे अधिकार असतील. इतर पाहुण्यांना लग्नात सहभागी होण्यापूर्वी आपले फोन व कॅमेरे जमा करावे लागतील. 

 

2. ड्रेस कोड
प्रत्येक पाहुण्याला ड्रेस कोड फॉलो करावाच लागेल. यात मेन इन फॉर्मल्स आणि विमेन इ गाउन असा उल्लेख करण्यात आला आहे. अर्थात पुरुषांनी सूट-बूट घालावे. तर महिलांनी गाऊन घालून लग्नात सहभागी व्हावे. यासाठी खास रंग अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सोबतच महिलांना हॅट घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुरुषांना ते बंधनकारक नाही.


3. मोठे बॅग बॅन
विंडसर कासलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 3 किमी दूर एक चेकपॉइंट आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाची तपासणी केली जाइल. प्रत्येकाला आपला फोन आणि कॅमेरा त्याच ठिकाणी जमा करावा लागणार आहे. या ठिकाणापासून पुढील 3 किमीचा प्रवास पायी करावा लागेल. त्यामुळे, कुणीही मोठी बॅग किंवा मोठी पर्स असे काहीच आणू नये.


4. गिफ्ट नको
कुणीही येताना गिफ्ट आणू नये. वाटल्यास चॅरिटी करावी. कुठल्याही पाहुण्याने हॅरी आणि मेघनला गिफ्ट देऊ नये असे सांगण्यात आले आहे. शाही घराण्याने 7 चॅरिटी संस्थांची यादी दिली. वाटल्यास त्या संस्थांना दान करता येईल. 


5. जागेसाठी भांडू नये
कुठल्याही पाहुण्याने आपल्याला दिलेल्या जागेवरच बसावे. जागेसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी भांडू नये. 600 पाहुण्यांपैकी प्रत्येकाला विशिष्ट अशी जागा देण्यात आली आहे. सर्वांना त्याच जागांवर बसावे लागेल. 


6. क्वीनच्या आसपासही येऊ नये
शाही घराण्यात पाहुणे होऊन गेल्यानंतर आपण क्वीनला भेटून शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर ते स्वप्नच राहील. प्रत्येक पाहुण्याला प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. कुणालाही क्वीनला भेटणे तर दूर तिच्या जवळपास जाता सुद्धा येणार नाही. कुणीही क्वीनला भेटण्याचा प्रयत्न करू नये.


7. शाही वधूचा बुके
ख्रिस्ती विवाह सोहळ्यांमध्ये लग्नानंतर वधून आपला बुके हवेत फेकण्याची आणि तिच्या अविवाहित मैत्रिणींनी ते झेलण्याची परमपरा आहे. परंतु रॉयल ब्राइडच्या बाबतीत असे काहीच घडणार नाही. शाही वधूच्या हातात फेकण्यासाठी बुके नसेल. त्यामुळे, ते हवेत फेकणे आणि कुणी झेलण्याचा प्रश्नच नाही.

बातम्या आणखी आहेत...