आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक दुसरा अब्जाधीश परोपकाराचे काम करताे, ४४% रुची क्रीडा क्षेत्रात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग - बिलिनिअर म्हणजेच अब्जधीश ज्या वेळी बिझनेस करत नसतात, ते परोपकारच्या कामात असतात. प्रत्येक दुसरा अब्जाधीश कोणत्या-ना कोणत्या पद्धतीने परोपकाराचे काम करतो. त्यांची रुची असलेल्यामध्ये क्रीडा क्षेत्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. कला सारख्या पारंपरिक क्षेत्रात नव्या अब्जाधीशांची रुची कमी आहे. केवळ २२ टक्के श्रीमंतांनाच हा शौक आहे.


ही माहिती वेल्थ-एक्सच्या ‘बिलियनेअर सेन्सस २०१८’ मध्ये समारे आली आहे. या ठिकाणी बिलियनेअरचा अर्थ कमीत कमी एक बिलियन डॉलर म्हणजेच ६,८०० कोटी रुपयांची संपत्ती असलेले असा आहे. मीडिया राइट्सच्या व्हॅल्युएशनमध्ये तेजीने वाढ झाल्याने क्रीडा क्षेत्रातील चाहते वाढले आहेत. मध्य पूर्व आणि चीनमधील अब्जाधीश युरोपियन फुटबॉलमध्ये पैसे लावत आहेत. कला क्षेत्रात अमेरिका आणि युरोपातील श्रीमंत पुढे आहेत मात्र, आशिया आणि मध्य पूर्वेकडील श्रीमंताची रुचीही तेजीने वाढत आहे. त्यामुळेच खासगी संग्रहालय, लिलाव आणि कला प्रदर्शनांची संख्या वाढली आहे.  अब्जाधीशांचे सरासरी वय जास्त आहे, शक्यतो त्यामुळे त्यांना पारंपरिक संगीताची जास्त आवड आहे.

 

 पुढील स्लाईडवर पहा, ४ वर्षांत श्रीमंतांनी दान केलेली रक्कम ४० लाख कोटी रु. होईल

बातम्या आणखी आहेत...