आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात मुलांसह आई-वडील, आजी-आजोबाही जुळेच; हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलचे कॅन्डिडो गोडोई एकमेव शहर आहे ज्याला ट्विन्स लॅन्ड म्हणूनही ओळखले जाते. हे नाव ठेवण्याचे कारण म्हणजे, या गावात सर्वात मोठ्या संख्येने जुळी मुले-मुली राहतात. या शहरातील 10 पैकी एक महिला जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म देतात. यासाठी अनेकांनी नाझींना जबाबदार धरले आहे. प्रत्यक्षात, नाझींच्या कॅम्पमध्ये असलेला डॉक्टर महायुद्ध संपल्यानंतर याच ठिकाणी येऊन वसला होता. त्याने येथे अनेक प्रकारचे वैद्यकीय प्रयोग केले. त्याचाच हा परिणाम असल्याचे म्हटले जाते.


- या शहरात 1959 पासून 2008 पर्यंत 436 जणांचा जन्म झाला. त्यापैकी 33 जुळे होते. हे सगळेच 4 किमीच्या अंतरावर राहतात. 
- इतिहासकारांच्या मते, एन्जल ऑफ डेथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिटरच्या जवळ राहिलेला डॉक्टर डॉ. जोसेफ मेंगेले यासाठी जबाबदार आहे.
- काहींच्या मते, तो नाझींच्या टॉर्चर कॅम्पमधून पसार होऊन ब्राझीलला गेला होता. याच ठिकाणी त्याने आपले मेडिकल प्रयोग केले.
- युद्धाच्या काळात तो आपल्या वैद्यकीय प्रयोगांसाठी कुप्रसिद्ध होता. 4 लाख ज्यूंच्या नरसंहारासाठी त्यालाच जबाबदार धरले जाते.
- जोसेफ हिटलरच्या आदेशांवर खास आर्यन मास्टर रेस तयार करण्यासाठी प्रयोग करत होता. त्याला प्रगत माणसांची फौज तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 
- माणसांत अनुवांशिक बदल करण्यासाठी त्याने नवीन डीएनए तयार करण्याचे प्रयत्न केले होते. त्याच प्रयत्नातून त्याने जुळ्या मुलांना जन्म देणारा जीन तयार केला. त्याचे प्रयोगामुळेच हे शहर जुळ्यांचे शहर बनले आहे.


महिलांवर उपचार करायचा जर्मन डॉक्टर
- शहरातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे, डॉ. जोसेफ 1960 च्या दशकात या शहरात अनेकवेळा आला. त्याने महिलांवर उपचार करतानाच आपले प्रयोग सुरू ठेवले. 
- अर्जेंटीनाचे इतिहासकार जॉर्ज कॅमारसा यांनी आपल्या पुस्तकात या शहराचा उल्लेख केला होता. लोकांनी त्यांना सांगितले, की जर्मन डॉक्टर यायचा तेव्हा तो स्थानिकांना रहस्यमयी औषध द्यायचा.
- शहरात 6000 बापटिझ्म सर्टिफिकेटची चौकशी करणाऱ्या अभ्यास समूहाने सांगितल्याप्रमाणे, ट्विन्स मुलांचे प्रकरण जोसेफ येण्यापूर्वीचे आहे. 
- तर ब्राझीलियन संशोधकांच्या मते, हे शहर जर्मन भाषिक समूहाने वसवले होते. कित्येक वर्षे एकाच समुदायात विवाह सुरू असल्याने असे प्रकार घडले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...