आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या कारमध्ये Make-Up लावत होती, धडक बसताच झाले असे हाल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँगकॉक - थायलंडच्या राजधानीत अपघाताचा एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पोलिसांनी एका कारमधून महिलेला तातडीने रुग्णालयात पाठवले. तिच्या डोळ्यात Eyeliner पेन्सिल घुसलेली होती. ती ज्या टॅक्सीमध्ये प्रवास करत होती, त्या टॅक्सीने एका पिक-अप ट्रकला मागून धडक दिली. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा ती मेक-अप लावत होती असे पोलिसांनी सांगितले आहे. 


नेमके काय घडले...
- वयाच्या विशीत असलेली ही तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी टॅक्सीने निघाली होती. परंतु, थायलंडच्या राजधानीत मोठा ट्रॅफिक जाम होता. या ट्रॅफिकमध्ये टाइमपास करताना तिने आपली मेक-अप किट काढली आणि स्वतःला सावरण्यात गुंग झाली. 
- मेक-अप करताना ती इतकी व्यस्त झाली की टॅक्सीने कधी स्पीड पकडली हे तिला कळालेच नाही. तिच्या हातात मस्कारा आणि आयलायनर पेन्सिल होते. त्याचवेळी समोर असलेल्या पिक-अप ट्रकने अचानक ब्रेक मारला. टॅक्सी आपल्या वेगात असल्याने नियंत्रण सुटले आणि त्याच पिक-अप ट्रकला मागून जोरदार धडक बसली. 
- झटका इतका जोरदार बसला की कारचे बोनट उद्ध्वस्त झाले. तसेच कारमध्ये बसलेली तरुणी ज्या पेन्सिलने आपले डोळे हायलाइट करत होती, तीच पेन्सिल तिच्या डोळ्यात घुसली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. 


डोळा वाचला...
ही विचित्र दुर्घटना इतकी वेगाने घडली की तिला सुद्धा आल्यासोबत काय घडले याचा पत्ता लागला नाही. तिला वेदनाही जाणवल्या नाही. रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केला, तेव्हा ती त्यांच्याशी बोलतही होती. सुदैवाने ही पेन्सिल तिच्या Eyeball च्या बाजूने होत आतमध्ये घुसली होती. त्यामुळे, तिच्या दृष्टीवर कायमचा परिणाम होणार नाही. परंतु, यापुढे धावत्या वाहनात ती आयुष्यात कधीच मेक-अप करणार नाही हे निश्चित...


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...