आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - यूरोपीयन संघाने फेसबूक यूझर्सच्या खासगी माहितीच्या चोरी प्रकरणी फेसबूक विरोधात चौकशीची तयारी सुरू केली आहे. तर अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने अशा प्रकारची चौकशी सुरू देखील केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फेसबूक आणि ट्रम्प यांच्या प्रचार संस्थेने 5 कोटी लोकांची खासगी माहिती चोरून त्याचा प्रचारासाठी दुरुपयोग केला असे आरोप आहेत. निवडणुकीत केम्ब्रिज अॅनलेटिका या संस्थेने ट्रम्प यांच्या प्रचारासाठी करार केला होता. त्याच कंपनीची सध्या चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू होताच कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी कंपनीचे प्रमुख अलेक्झांडर निक्स यांना निलंबित केले आहे.
फेसबूक प्रमुखांनी स्पष्टीकरण द्यावे...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा ठेका घेणाऱ्या कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. तरीही या कंपनीने अमेरिकेच्या निवडणुकीत काम केले. अमेरिकेत या प्रकरणामुळे खळबळ सुरू असताना त्याचे पडसाद ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये सुद्धा दिसून आले आहेत. युरोपियन संघाचे सदस्य या प्रकरणात फेसबूकच्याही चौकशीची मागणी करत आहेत. एवढेच नव्हे, तर फेसबूक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्टीकरण द्यावे ही मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.