आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे अमेरिका-इस्रायलचा जल्लोष, दुसरीकडे 8 महिन्यांच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम - हा फोटो त्या आईचा आहे जिच्या तान्ह्या बाळाने 8 व्या महिन्यातच या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूचे कारण काही वैद्यकीय नव्हते. तर इस्रायल आणि अमेरिकेचे नवीन दूतावासाचा जल्लो साजरा होत असताना त्याचा मृत्यू झाला. इस्रायलने नुकताच आपल्या 70 वा वाढदिवस साजरा केला. त्याच दिवशी इस्रायलव्याप्त जेरुसलेमवर अमेरिकेने आपल्या नव्या दूतावासाचे उद्घाटन केले आहे. त्याचा विरोध करण्यासाठी 40 हजार आंदोलक इस्रायलच्या कुंपनांजवळ एकवटले आणि जोरदार विरोध केला. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी इस्रायलने 2700 स्नाइपर आणि सैनिक तैनात केले. हे स्नायपर आणि सैनिक त्या हजारोंच्या गर्दीवर गोळीबार आणि ड्रोनच्या माध्यमातून टिअर गॅस बॉम्ब फेकत होते. त्याच टिअर गॅसच्या हल्ल्यात या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. 


सीमेपासून दूर होते बाळ...
पॅलेस्टाइनच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 40 हजार पॅलेस्टीनी आंदोलक निदर्शने करत होते. त्या घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर एक आई आपल्या 8 महिन्यांच्या बाळासह तंबूत होती. टिअर गॅस बॉम्ब फेकणाऱ्या ड्रोनचा एक हल्ला त्या तंबूजवळ सुद्धा झाला. अश्रु गॅस श्वसनात गेल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला. इस्रायली अधिकाऱ्यांनी मात्र त्या बाळाची आई आंदोलकांमध्ये सहभागी होती आणि ती आपल्या बाळाला सुद्धा घेऊन आली असा दावा केला. एवढेच नव्हे, तर त्या मुलाचा मृत्यू आरोग्याच्या दुसऱ्याच समस्येमुळे झाला असेही काही इस्रायली डॉक्टरांनी म्हटले. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी त्या बाळाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे. पण, मानवाधिकार संघटनेने त्या बाळाच्या देहाचे शवविच्छेदन करून सत्य समोर आणणार असा दावा केला आहे. 


आई काय म्हणाली...
- पीडित बाळाची आई मरियमने सांगितल्याप्रमाणे, ती आपल्या भावासोबत एका डेन्टिस्टकडे जात होती. हा रस्ता सीमा भागापासून अवघ्या काही अंतरावर होता. त्यावेळी मरियमसोबत तिची 8 महिन्यांची मुलगी लैला सुद्धा होती. पुढे जात असताना गर्दी वाढत गेली. सर्वत्र अश्रुधुराच्या नळकांड्यांचा धूर होता. त्याच ठिकाणी मरियमला तिची आई दिसली. 
- बाळाला सोबत घेऊन जाणे योग्य नसल्याचे पाहता तिने आपले बाळ आजींकडे सोपविले आणि डेन्टिस्टकडे जाणार तेवढ्यात एका ड्रोनने त्यांच्याजवळ टिअर बॉम्ब फेकला. यात मरियमची आई आणि ते बाळ अडकले. श्वास घेता येत नसल्याने लैला धायमोकलून रडत होती. त्यांनी तेथून दूर होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, तोपर्यंत लैला शांत झाली. त्यांना वाटले, झोपली असेल. पण, काही मिनिटांतच तिचे शरीर निळसर झाले. तिचा मृत्यू झाला होता. 


58 जणांचा मृत्यू
- हे सगळे होत असताना अवघ्या 40 मैल अंतरावर जेरुसलेम येथील अमेरिकेच्या नवीन दूतावास उद्घाटन कार्यक्रमात अमेरिका आणि इस्रायली अधिकारी जल्लोष साजरा करत होते. या कार्यक्रमात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका आपला पती जेरेड कुशनेरसह उपस्थित होती. सर्वांनी आनंदोत्सव साजरा करत हवेत इस्रायल आणि अमेरिकन ध्वजांचे बलून सोडले. 
- तर दुसरीकडे एकही पॅलेस्टिनी इस्रायलमध्ये घुसू नये यासाठी 2700 सैनिक 40 हजार आंदोलकांच्या जमावावर गोळीबार करत होते. ड्रोनने अश्रू धुरांचे बॉम्ब फेकत होते. यामध्ये त्या 8 महिन्यांच्या चिमुरडीसह 58 पॅलेस्टिनींच्या मृत्यू नोंद झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...