आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यापेक्षा महागडी आहे या बकऱ्यांची उल्टी, लाखो कमवत आहेत शेतकरी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - झाडावर चढून बसणाऱ्या या शेळ्या जगासाठी धक्कादायक असले तरी मोरॉक्कोमध्ये हे रोजचे चित्र आहे. येथील झाडांवर चिमण्या नव्हे, तर शेळ्याच दिसून येतात. आर्गनच्या झाडावर लागलेली फळे खाण्यासाठी त्या चढतात. अशात त्यांना शेतकी रोखत नाहीत, उलट बकऱ्यांना ती फळे खाण्यासाठी सोडून देतात. कारण, याच फळांची उल्टी त्यांच्यासाठी सोन्यापेक्षा महाग आहे. ही फळे खाऊन शेळ्यांनी केलेली उल्टी आणि विष्ठा यांच्यातून शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. 

 

- आर्गनची फळे खाण्यासाठी येथील शेळ्या 30 फुट उंच झाडांवर सुद्धा सहज चढतात. त्यांचे मालक आणि शेतकरीच त्यांना चढणे शिकवतात.
- बकऱ्या फळे तर खातात आणि पचवतातही. पण, त्या फळाच्या (आर्गन) बिया त्या पचवू शकत नाहीत. त्याच बिया उल्टी आणि विष्ठेतून तशाच निघतात. 
- येथूनच शेळी मालकांचे खरे काम सुरू होते. ते सगळी विष्ठा एका ठिकाणी गोळा करतात आणि त्या निघालेल्या बियांचे आवरण काढून त्यातील शेंगा काढल्या जातात. 
- शेळ्यांच्या पचनातून बाहेर आलेल्या बियांमधील शेंगा अधिक नरम होतात असे मानले जाते. त्यामुळेच, शेतकरी आणि बकरी मालकांना तेल काढणे सोपे होते. 
- या शेंगांना भाजून त्याचे तेल काढले जाते. त्वचारोग आणि सौंदर्य प्रसाधनांच्या इंडस्ट्रीमध्ये या तेलास मोठी मागणी आहे. आर्गन तेलाची एक लिटरची बाटली तब्बल 60 हजार रुपयांमध्ये विकली जाते. 
- अशाच प्रकारे तेल काढून आणि ते घाऊक बाजारांमध्ये मोठ-मोठ्या कंपन्यांना विकून शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बिझनेसचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...