आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Husband च्या स्पर्शालाही घाबरते; बलात्काराचा तपास करणारी Lady Officer आजारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - काही प्रकरणे इतकी वीभत्स असतात की त्या आयुष्यभर मनातून त्याची भीती जात नाही. अशा घटना ऐकूणही दुसऱ्यांच्या मनावर परिणाम होते. असेच एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडले आहे. ती बलात्कार प्रकरणाचा तपास करत होती. तपासात करताना तीच आजारी पडली. एवढेच नव्हे, तर तिला इतका मोठा मानसिक धक्का बसला की ती आपल्या पतीच्या स्पर्शाला सुद्धा घाबरते.


नेमके काय आहे प्रकरण..?
> 2009 मध्ये जगातील सर्वात लोकप्रीय पोलिस विभाग स्कॉटलैंड यार्डमध्ये 3 वर्षे काम केल्यानंतर महिला पोलिस अधिकाऱ्याला सफायर युनिटमध्ये नियुक्ती देण्यात आली. या युनिटमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणांची चौकशी केली जाते. डिसेंबर 2014 मध्ये या महिला अधिकाऱ्याला मायकल डीकोस्टा केस सुपूर्द करण्यात आले. 
> मायकलवर 3 लहान मुलींचे सलग 3 वर्षे लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते. या महिला अधिकाऱ्याने प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला. टीमसोबत जाऊन तिने आरोपी मायकलच्या घरात तपासाला सुरुवात केली. या ठिकामी तिला 100 व्हिडिओ आणि 1 डायरी सापडली. मायकलने किती क्रूर पद्धतीने या मुलींचे शोषण केले त्याचे डीटेल्स या व्हिडिओ आणि डायरीमध्ये नमूद होते. 
> संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये महिला अधिकारी त्या सर्व पीडित मुलींच्या संपर्कात होती. त्यामुळे, ती पीडित मुलींशी भावनिकरित्या जोडली गेली. तर दुसरीकडे, चौकशीत तिने ते 100 व्हिडिओ वारंवार पाहिले. अनेकवेळा तर सलग 8-8 तास बसून तिने हे व्हिडिओ पाहिले. यामध्ये लैंगिक शोषणासह त्या नराधमाने केलेल्या विकृत आणि वीभत्स अत्याचारांचा समावेश होता. 


अचानक पडली आजारी
> मायकल प्रकरणात अचानक एक ट्विस्ट आला. चौकशी करणारी महिला अधिकारी अचानक आजारी पडली. तिने आपल्या वरिष्ठांना सांगितली, तेव्हा त्यांनी तिला यावर फारसे लक्ष दिले नाही. उलट, तिला या केसवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. 
> प्रकरणाचा तपास करताना 3 महिने उलटले होते. मार्च 2015 पर्यंत महिला अधिकाऱ्याला दुःस्वप्न येण्यास सुरुवात झाली. डोळे बंद करताच तिला ते व्हिडिओ आणि डायरितील गोष्टी स्मरणात येत होत्या. झोपेत सुद्धा त्याच गोष्टींचे स्वप्न तिला पडत होते. यामुळे हळू-हळू तिची झोप उडाली आणि खासगी आयुष्य कठिण बनले. 
> त्या नराधमाने केलेले अत्याचार डोक्यातून जात नसल्याने तिला पतीसोबत राहणे सुद्धा कठिण बनले होते. पतीने स्पर्श केला तरीही ते घाबरून जायची. पतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना सुद्धा तिला असह्य वेदना सुरू झाल्या. रात्री बेरात्री उठून ती धायमोकलून रडायची. मानसोपचार तज्ञांकडून तिला कौन्सलिंग देण्यात आले. तसेच एका महिन्यानंतर तिला सुट्टी देण्यात आली. 


नराधमाला झाली 16 वर्षांची कैद
लहान मुलींचे शोषण करणारा नराधम मायकल डीकोस्टा प्रकरणाचा 2015 मध्ये निकाल लागला. त्याला एकूण 25 आरोपांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले. तसेच त्याला 16 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर त्या महिला अधिकाऱ्याला 3 वर्षे मानसिक उपचार घ्यावा लागला. आपल्याला झालेल्या मानसिक ताणावरून तिने पोलिस विभागविरोधात 2 लाख युरोंच्या भरपाईचा खटला दाखल केला. या खटल्यात तिला पोलिस संघटनांकडून समर्थन मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...