आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पांचा लाडका होता हा हुकूमशहा, तरी जगापासून ठेवले लपवून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणी असा दिसायचा किम जोंग उन - Divya Marathi
लहानपणी असा दिसायचा किम जोंग उन

इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किमचे बालपण एकटेपणातच गेले आहे. हा खुलासा त्याच्या वडिलांचा अंगरक्षक राहिलेल्या ली यंग गकने केला आहे. लीने सांगितल्याप्रमाणे, किम जोंग उनला साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले होते. किमचा सावत्र भाऊ किम जोंग नाम यालाच उत्तर कोरियाचा उत्तराधिकारी मानले जात होते. किम जोंग उनला लहानपणी त्याच्या वयाच्या मित्रांसोबत सुद्धा खेळण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे, ज्युनिअर किम नेहमीच चिड-चिड करायचा.

 

- ली यंग गकने जवळपास 11 वर्षे सुप्रीम लीडरचे वडील किम जोंग इलच्या अंगरक्षकाची जबाबदारी सांभाळली. पण, लेबर कॅम्पमध्ये टॉर्चर सहन केल्यानंतर ली यंगला देश सोडून पसार व्हावे लागले. आता तो कॅनडात राहतो. 
- माजी सुरक्षा रक्षकाने एबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, किमला अतिशय गुप्तरीत्या ठेवण्यात आले होते. त्याच्यासोबत खेळण्यासाठी त्याच्या वयाचा कुणीच नव्हता. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीवर चिडणे त्याचे स्वभाव बनले होते. 
- लीने सांगितल्याप्रमाणे, किम जोंग बालपणापासूनच रागीट होता. काही बोलणे किंवा करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला काय वाटणार याची त्याला काहीच चिंता नव्हती. 
- किम जोंग उन लहानपणापासूनच आपल्या मनासारखा वागायचा. त्याला थांबवणारे कुणीच नव्हते. त्याची देखरेख करणाऱ्या महिलांसोबत सुद्धा त्याने कित्येक वेळा असभ्य वर्तणूक केली होती. 
- कुठेही उड्या मारणे, काहीही तोडून फेकणे आणि कुणालाही राग-राग करणे त्याचा स्वभाव गुणधर्म बनला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...