आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Playboy मॉडेलने मुलासह 25 व्या मजल्यावरून घेतली उडी; समोर आले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - प्लेबॉयची माजी मॉडेल आणि लेखिका स्टेफनी जेम्स हिने आपल्या चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली आहे. न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये ती आपल्या मुलासह 25 व्या मजल्यावर थांबली होती. त्याच मजल्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मुलासह उडी घेतली. हे दोघे सेकंड फ्लोअरच्या बाल्कनीत पडले. मायलेकरुचा जागीच मृत्यू झाला. ही खरोखर आत्महत्या होती, की मर्डर याचा तपास आता न्यूयॉर्क पोलिस विभाग करत आहे. 


मुलाच्या कस्टडी केसवर होती चिंतीत
46 वर्षीय माजी प्लेबॉय मॉडेल आणि तिचा माजी पती चार्ल्स निकोलै यांच्यात मुलगा विन्सेंटच्या (7) कस्टडी संदर्भात वाद सुरू होता. कोर्टात सुरू असलेल्या या खटल्यामुळे आपला मुलगा विन्सेंट दूर जाईल अशी भिती तिला होती. स्टेफनीच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या 20 वर्षांपासून स्टेफनी आणि चार्ल्स एकत्रित राहत होते. त्यानंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. अनेकवेळा भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना सुद्धा बोलवावे लागले. पतीला वैतागून ती आपल्या जुन्या बॉयफ्रेंडकडे जाणार होती. पण, चार्ल्सला ते आवडले नाही आणि त्याने स्टेफनी विरोधात खटला दाखल केला. सोबतच, या खटल्यामुळे स्टेफनी डिप्रेशनमध्ये गेली होती हा दावा तिच्या वकिलांनी फेटाळला आहे. 


16 व्या वर्षी सुरू केली मॉडेलिंग
स्टेफनीने आपल्या वयाच्या 16 व्या वर्षीपासून मॉडेलिंग सुरू केली होती. प्लेबॉयच्या नोव्हेंबर 1992 अंकात ती कव्हर पेजवर झळकली होती. यानंतर अनेक बोल्ड मेन्स मॅगझीनसाठी तिने फोटोशूट केले. तिने असंख्य महागड्या ब्रॅन्डसाठी मॉडेलिंग सुद्धा केली. पण, त्यानंतर मॉडेलिंग सोडून एक लेखिका म्हणून करिअर निवडले.  


पोलिसांकडून वसूल केले होते 8 कोटी
स्टेफनीने न्यूयॉर्क पोलिस विभागाच्या विरोधात खटला दाखल केला होता. तसेच तो जिंकलाही होता. 2006 मध्ये एका टॅक्सी चालकासोबत तिचा वाद सुरू होता. त्याचवेळी ड्रायव्हरने रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांकडे धाव घेतली आणि ही आपला खून करत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी वेळीच तिला घेरून जमीनीवर पाडले आणि मारहाण सुद्धा केली. यात जखमी झाल्यानंतर तिने कोर्टात पोलिसांच्या विरोधात खोट्या आरोपांत मारहाण केली असा आरोप लावला होता. कोर्टाने तिच्या बाजूने निकाल देत पोलिसांना 12 लाख अमेरिकन डॉलर देण्याचे आदेश दिले होते. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या माजी प्लेबॉय मॉडेलचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...