आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मा शुद्धीकरणाच्या नावे करायचा रेप, वादग्रस्त धर्मगुरूचा कॅन्सरने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंड - जगभरात धर्माच्या नावे भ्रष्टाचार आणि लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबांची संख्या काही कमी नाही. न्यूझीलंडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक भोंदू बाबा होता. तो महिला आणि अल्पवयीन तरुणींचे सुद्धा धर्माच्या आड लैंगिक शोषण करायचा. ईश्वर आणि नरक अशा भिती दाखवून त्यांना कैदेतही ठेवत होता. आपल्या शीष्यांकडून काही चूक झाल्यास तो बांधून मारहाण करायचा. महिला आणि लहान मुलांना अतिशय हीन वागणूक देत होता. त्याचा नुकतेच कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. 


तरुणींनी सांगितली आपबिती
हृदय पिळवटून टाकणारे अत्याचार करणाऱ्या या कथित धर्मगुरूचे नाव होपफुल ख्रिश्चन असे आहे. होपफुल न्यूझीलंडमध्ये एका धार्मिक समूहाचा (कल्ट) लीडर होता. याच महिन्यात त्याचा प्रॉस्टेट कॅन्सरने मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्याच्या तावडीतून अनेक तरुणी सुटल्या आहेत. त्या सर्वांनी आपली आपबिती मांडली आहे. याच समुदायातील काही माजी महिला सदस्यांनी होपफुलवर गंभीर आरोप दाखल केले. त्यानंतर अनेक महिला आपल्या आरोपांसह समोर आल्या. नरकाची भिती दाखवून तोच या महिलांना नरक यातना देत होता. 


'तो सैतान होता'
पीडित तरुणींपैकी एकीने सांगितल्याप्रमाणे, 'तो खरोखर एक सैतान होता. 19 वर्षांची असताना त्याने माझ्यावर 3 वेळा रेप केला. तो खूपच घाणेरडा माणूस होता. ' दुसऱ्या एका तरुणीने सांगितले, की थेरेपीच्या नावे त्याने हद्दच पार केली. त्याने या तरुणीवर लाकडाने बलात्कार केला होता. 


महिला, लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार
होपफुल 1969 मध्ये एक धार्मिक संस्था (कल्ट) ची स्थापना केली होती. मूळचा ऑस्ट्रेलियन असला तरीही तो न्यूझीलंडला स्थायिक झाला होता. त्याच्या ग्लोरियावेल नावाच्या त्याच्या कल्टमध्ये 550 सदस्य होते. येथे तो महिलांना पुरुषांची दासी बनवून ठेवायचा. त्या महिलांना नेहमीच आपला चेहरा झाकून ठेवण्याचे आदेश होते. वाट्टेल त्या वृद्धासोबत तरुणींचा तो बळजबरी विवाह लावून द्यायचा. त्याने आपल्या नातीला सुद्धा सोडले नाही. होपफुलची नात लिलिया ट्वाराने सांगितल्याप्रमाणे, लग्नापूर्वी सेक्सपासून प्रत्येक बाबतीत तो तिला नरकाची भिती दाखवायचा. त्याने आपल्या नातीचे जेवण सुद्धा बंद केले होते. संधी पाहताच ती आपल्या आजोबाच्या तावडीतून पसार झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...