आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकुशिमातील किरणोत्सर्जनात वाढ; ग्रीनपीसने दिला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- फुकुशिमा प्रांतातील अणुऊर्जा प्रकल्पाजवळील क्षेत्रात किरणोत्सर्जनाचा स्तर धोक्याच्या पातळीवर गेल्याचे ग्रीनपीस संघटनेने गुरुवारी सांगितले. सुरक्षा स्तरापेक्षा किरणोत्सर्जनाचा स्तर १०० पटीने वाढला आहे. ग्रीनपीसच्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, नामी आणि इटेट या दोन शहरात हा स्तर सर्वाधिक दिसून आला. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पापासून यांचे अंतर १० आणि ४० किलोमीटर आहे. मार्च २०१७ मध्ये हे क्षेत्र रिकामे करुन घेण्याचे आदेश देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे हा परिसर आता निर्जन असणे गरजेचे आहे. येथील महिला, मुलांना त्वरित हलवण्याचा इशारा ग्रीनपीसने दिला आहे. गर्भवतींना येथून प्राधान्याने हलवण्यात यावे, असे ग्रीनपीसने म्हटले आहे. 

 
दरम्यान, जपानच्या प्रशासनाने म्हटले आहे की, ११ मार्च २०११ रोजी येथे भूकंप आणि त्यानंतर सुनामी आली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्जन वाढले होते. 

 

येथे वस्ती असणे मानवाधिकारांविरुद्ध   
ग्रीनपीस बेल्जियमचे प्रमुख जेन वांद पुते यांनी म्हटले आहे की, फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ मानवी वस्ती असणे हे नागरिकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. या क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणाचे जेन प्रमुख आहेत. गुरुवारी हा अहवाल त्यांनी सादर केला. येथील सुरक्षा व प्रतिबंधक उपाय त्वरित वाढवण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...