आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात अनोखे हायवे, इमारतीच्या 16 मजल्यावरून जातो रस्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सर्वात होतकरू देशांपैकी एक जपानचा 11 फेब्रुवारी रोजी स्थापना दिवस आहे. जवळपास 6800 बेटांना जोडून हा देश विकसित झाला आहे. काही नवीन करण्याच्या बाबतीत हा देश नेहमीच पुढे असतो. इंजिनिअरिंगमध्ये जपानचा हात कुणी धरू शकत नाही. यासंदर्भातच आम्ही आपल्यासाठी जपानच्या एका अजब बिल्डिंगचे फोटो घेऊन आलो आहे. या बिल्डिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, या इमारतीमधूनच एक उड्डानपुल जातो. बिल्डिंगची निर्मिती आणि ब्रिज असे का आहेत, याची गोष्ट त्याहून गमतीशीर आहे. 

 

चौथ्या मजल्यानंतर थेट 8 व्या मजल्यावर पोहोचते लिफ्ट
> ओसाका शहरातील गेट टॉवर बिल्डिंग इंजिनिअरिंगसाठी जगापुढे जबरदस्त उदाहरण आहे.
> जगातील ही एकमेव बिल्डिंग आहे, ज्यातून चक्क एक्सप्रेस हायवे जातो. 
> हा हायवे इमारतीचा 5 वा, 6 वा आणि 7 वा मजला घेरतो. त्यामुळे, या तिन्ही मजल्यांवर कुठलेही घर नाही.
> त्यामुळेच, येथील लिफ्ट 1, 2, 3 असे करून चौथ्या मजल्यावर तर जाते. पण, चौथ्यानंतर थेट 8 व्या मजल्यावर जाऊन थांबते. 
> इमारत आणि महामार्गाचा डिझाईन करताना खूप मोठे वाद झाले होते. मात्र, त्यानंतर हा जगातील इंजिनिअरिंगसाठी एक आदर्श आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.


5 वर्षे चालला कायदेशीर लढा
- प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ एक इमारतच बांधली जाणार होती. त्या इमारतीचा आराखडा आणि मंजुरी 1982 मध्येच झाली. 
- पण, याच ठिकाणी हायवे तयार होणार याची माहिती इमारतीच्या मालकाला नव्हती. इमारतीच्या मंजुरीपूर्वीच हायवेला सुद्धा मंजुरी मिळाली होती. 
- यानंतर इमारतीचे बांधकाम कायदेशीररीत्या थांबवण्यात आले. पण, मालक इतक्यात शांत झाला नाही. 
- मालकाने प्रशासनाविरोधात कोर्टात धाव घेतली. तसेच सरकार आणि मालकाचा वाद 5 वर्षे सुरूच होता. 
- 1989 मध्ये शहर विकास आणि हायवे नियमांमध्ये बदल झाले. त्यामुळे हायवेच्या मधूनच इमारत बांधकाम करण्याची परवानगी मिळाली. 
- हायवेसाठी प्रशासन इमारतीच्या 3 मजल्यांचा वापर करत असल्याने त्या तिन्ही मजल्याचे भाडे दरवर्षी प्रशासनाला मालकाकडे जमा करावे लागतात. 
- या बिल्डिंगचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य हे आहे, की बिल्डिंगमधून जाणाऱ्या वाहनांचा थोडासाही आवाज इमारतीमध्ये येत नाही. 
- या इमारतीचे बांधकामच असे करण्यात आले आहे, की हॉर्न किंवा बेधडक जाणाऱ्या वाहनांचा आवाज आतमध्ये जाऊ नये.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...