आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका vs यूरोप: जी-7 संमेलन अर्धवट सोडून निघाले डोनाल्ड ट्रम्प, जागतिक नेते नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रँकफर्ट - जी-7 संमेलनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनावरून जागतिक नेते नाराज आहेत. जी-7 देशांच्या इतर 6 देशांवर नाराज होऊन ट्रम्प हे संमेलन अर्धवट सोडून अमेरिकेला निघाले. विविध गोष्टींवर झालेल्या वादांमुळे संमेलनात अमेरिका विरुद्ध युरोप अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ट्रम्प यांच्या कुठल्याही मुद्द्यावर युरोपियन नेत्यांचे एकमेत होऊ शकले नाही. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी सोमवारी सांगितल्याप्रमाणे, ट्रम्प संयुक्त संबोधनात सुद्धा सहभागी झाले नाहीत. हे अतिशय निराशाजनक असून गंभीर गोष्टीचे संकेत आहेत. पण, वेळ अजुनही गेलेली नाही. क्युबेक येथे झालेल्या संमेलनातील फोटोंमध्ये सुद्धा ट्रम्प सर्वांसमोर एकटे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे, रविवारीच ते संमेलन अर्धवट सोडून सिंगापूरला रवाना झाले. एवढेच नव्हे, तर ट्वीट करून आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली. 


आणखी काय म्हणाल्या मर्केल?
एका मुलाखतीमध्ये मर्केल म्हणाल्या, "ही वेळ अतिशय आव्हानात्मक असून परिस्थिती निराशाजनक आहे. जी-7 समूहात अजुनही सर्व संपलेले नाही. मी संतप्त भाषेचा वापर करू इच्छित नाही. मी निराशाजनक या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे संकेत मिळतात.' अमेरिकेत जर्मन कार उत्पादन आणि निर्यातीवर लागणारा वाढीव शुल्क सर्वांना खटकला. या मुद्द्यावर बोलताना मर्केल म्हणाल्या, 'जर्मन कार इंडस्ट्रीत 8 लाखांहून अधिक लोक काम करतात. आम्ही काय करू शकतो, यावर फेरविचार करावा लागणार आहे. युरोपियन युनियन या (वाढीव शुल्क) विरोधात कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे.'


रशियाच्या मुद्द्यावर सुद्धा तणाव
- जी-7 देशांची संघटना प्रत्यक्षात जी-8 संघटना होती. परंतु, दोन वर्षांपूर्वी रशियाला यातून काढण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यावेळी झालेल्या संमेलनात आपल्या भाषणामध्ये रशियाचे कौतुक केले. रशिया एक मोठी अर्थव्यवस्था असून या देशाला पुन्हा या समूहात सहभागी करायला हवे असे त्यांनी म्हटले होते. या मुद्द्यावरून सुद्धा संमेलनात गदारोळ झाला. 
- यूक्रेनचा स्वायत्त प्रांत क्रीमिया 2014 मध्ये रशियाने काबीज केला. त्याच मुद्द्यावरून रशियाला या समूहातून बाहेर काढण्यातल आले आहे. सोबतच, सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यावर सुद्धा युरोपियन देशांचा आक्षेप आहे. 


ट्रम्प यांच्या ट्वीटने आणखी वाद
- ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यातील वाद संमेलनात चर्चेचा विषय ठरला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन यांनी ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूलण्याचे आरोप लावले आहेत. ते शेतकरी आणि कंपन्यांसह कामगारांकडून सुद्धा अधिकचा कर वसूल करत आहेत असे ट्रुडो म्हणाले. पण, ट्रम्प यांनी ट्वीट करून जस्टिन यांना खोटारडा म्हटले आहे.
- जी-7 संमेलन सोडून जात असतानाही ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संयुक्त संबोधनापासून दूर राहण्याचे निर्देश दिले. सोबतच, कार इंडस्ट्री आणि युरोपियन देशांच्या स्टील उत्पादनावर भविष्यात अधिकचा कर लादणार असा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...