आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याला 65 लाख रुपये उडवतो हा PLAYBOY, यामुळे सोडावा लागला देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीचा कॉस्मेटिक टायकून बास्तियन योटा आणि मारिया योटा आपल्या लग्जरी लाइफ आणि पार्ट्यांसाठी ओळखले जातात. एक काळ असाही होता, जेव्हा बास्तियानकडे खर्च करायला दमडीही नव्हती. मात्र, आता अब्जाधीश असलेला बास्तियान Playboy आणि त्याचे घर Playboy Mansion म्हणून ओळखल्या जाते. त्याची नेट वर्थ 64 अब्ज रुपये आहे. तसेच तो महिन्याला स्वतःवर तब्बल 65 लाख रुपयांची उधळपट्टी करतो. 

 

यामुळे सोडावा लागला देश
- बास्तियान जर्मनीत राहत असताना फक्त आणि फक्त पार्ट्या करायचा. त्याच्या शेजाऱ्यांना ते आवडत नव्हते. त्यांनी बास्तियानच्या तक्रारी सुरू केल्या. 
- दररोज लाउड म्युझिक, पूल पार्टी आणि ओल्या पार्ट्यांमध्ये आरडा-ओरड करणाऱ्या तरुणींचा धिंगाणा रात्रभर सुरू राहायचा.
- बास्तियान एकदा म्हणाला होता. त्याच्या घरात होणाऱ्या आलीशान पार्ट्या, त्यामध्ये नाचणाऱ्या बिकिनी गर्ल्स पाहून शेजारी जळत होते. त्यामुळेच, आपण देश सोडला.
- तो आपल्या पत्नीसह आता अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात स्थायिक झाला. 2015 मध्ये या दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत शेजाऱ्यांचे गाऱ्हाणे नसले तरीही आपण देश सोडल्याचे दुख वाटते असेही तो म्हणाला होता. 
- आपल्या रंगेल पार्ट्यांवर तो महिन्याला किमान 65 लाख रुपये खर्च करतो. कधी-कधी तो एका दिवसाला सुद्धा 12 लाख रुपये उडवतो. त्याच्या अपार्टमेंट मासिक भाडे 7 लाख रुपये आहे. 


कॉस्मेटिक आणि असा उद्योग...
- कॉस्मेटिक टायकून बास्तियानच्या कमाईचे मोठे साधन त्याच्या ग्लोबल स्किन, टॅटू लेझर आणि आयपीएल डिव्हाइस आहेत.  
- या व्यतिरिक्त त्याने 2014 मध्ये GIBacon हे सॉफ्टवेअर लॉन्च केले. ही कंपनी सॉफ्टवेअर प्रोव्हायडर असून ऑडियो आणि व्हिजुअलच्या माध्यमातून लोकांना कनेक्ट करते. 
- त्याच्या कमाईचे तिसरे साधन त्याचे पब्लिकेशन माइंडस्लिमिंग आहे. वजन कमी करण्यासाठी जाहिराती करण्याचे क्रांतीकारी स्वरूप या कंपनीने सादर केले आहे. 
- त्यांच्या बिझनेसची ब्रँडिंग प्रामुख्याने इंस्टाग्राम अकाउंटवरून केली जाते. सोशल मीडियावर त्यांचे 7 लाखांहनू अधिक फॉलोअर्स आहेत.  

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बास्तियानच्या आलीशान लाइफस्टाइलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...