आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक देशाचे असे PHOTOS, जे तुम्ही प्रथमच पाहत असाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियातील उत्तर-पूर्वी शहर कामिशलीमध्ये नुकताच कुर्दिश कम्युनिटीच्या लोकांनी फॅशन शोचे आयोजन केले होते. - Divya Marathi
सीरियातील उत्तर-पूर्वी शहर कामिशलीमध्ये नुकताच कुर्दिश कम्युनिटीच्या लोकांनी फॅशन शोचे आयोजन केले होते.

इंटरनॅशनल डेस्क- मिडिल ईस्ट कंट्री सीरियाची स्थिती लपून राहिली नाही. जवळपास संपूर्ण देशच भीषण युद्धाला आणि उपासमारीला तोंड देत आहे. मग, अशा दहशतीच्या वातावरणातही तेथे फॅशन शो होऊ शकतो का? तर होय सीरियातील उत्तर-पूर्वी शहर कामिशलीमध्ये नुकताच कुर्दिश कम्युनिटीच्या लोकांनी फॅशन शोचे आयोजन केले होते. ज्यात कुर्दिश महिलांनी खूपच उत्साहाने सहभाग नोंदवला.

 

पाच वर्षापूर्वी झाला होता बारहुआ फॅशन शो...
- शोत सहभागी झालेल्या एफिन हिसू नावाची तरूणीने सांगितले की, येथे फॅशन शो सुमारे 5 वर्षानंतर झाला. येथे 2011 मध्ये शेवटचा फॅशन शो पार पडला होता. ज्यात खूप तरूणी सहभागी झाल्या होत्या. 
- वर्ष 2011 मध्ये दहशतवादी संघटना इसिसच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हिंसेने होरपळत आहे.
- इसिसने अनेक शहरांत कब्जा केला आहे. यानंतर तेथील महिलांवर अत्याचार होत आहेत. 
- गैर-मुस्लिम महिला आणि अल्पवयीन मुलींवर गॅंगरेप करून त्यांना सेक्स स्लेव बनवले गेले आहे.
- याचमुळे चिडून कुर्दिश महिलांनी अखेर हत्यारं उचलली आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीरियन लष्करासोबत उभ्या राहिल्या.
- या वेळी सीरियातील कामिशली शहरासह अनेक शहरे दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटली आहेत.
- तेथील शहराची स्थिती हळू हळू आता सुधारत आहे तसेच महिला व मुलांना मोकळीक मिळाली आहे.
- याचमुळे कुर्दिश कम्युनिटीच्या लोकांनी खासकरून फॅशन शो आयोजित केला होता. 
- यात मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि सुंदर कुर्दिश तरूणींनी कॅटवॉक केले. 
- सीरियाची स्थिती खराब असतानाही फॅशन शो पार पडल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.


पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कुर्दिश तरूणींच्या फॅशन शोचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...