आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगनंतर लष्करात करिअर; सौंदर्य भोवला, सोडावी लागली नोकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये राहणारी कॅटरीना हॉजने मॉडेलिंग आणि फॅशन इंडस्ट्री सोडून देशासाठी काही करण्याच्या हेतूने लष्करात प्रवेश केला. पण, तिला याची जाणीवही नव्हती की तिचे सौंदर्यामुळे तिला त्रास होईल. मिस इंग्लंड राहिलेली कॅटरीना वयाच्या 17 व्या वर्षी लष्करात पदार्पण करून इराक युद्धात आपल्या देशासाठी झटली. पण, तिला नेहमीच टोमणे आणि अर्वाच्य भाषा ऐकूण घ्यावी लागली. या घटनेच्या 12 वर्षांनंतर तिने आपले मौन सोडले आहे.

 

- आता 30 वर्षांची कॅटरीना हिने आपले मनोगत व्यक्त केले. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पुरुष सैनिक छळत होते असा आरोप लावला. 
- सौंदर्यावरूनच तिच्यावर वेळोवेळी टीका आणि कॉमेंट केले जात होते. तिने याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारही केली. पण, काहीच झाले नाही.
- लष्करात देशसेवा देणाऱ्या महिलांना अशी वागणूक दिली जाते याची आपण कल्पनाही केली नव्हती. हा तर महिलांवर अत्याचार आहे. मला एखाद्या वस्तूप्रमाणे पाहिले जात होते. असे तिने सांगितले.
- लष्करात असतानाच तिला कॉम्बॅट बार्बी असे नाव देण्यात आले होते. ती आजही याच नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...