आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार-सर्वोच्च न्यायालयात मालदीवमध्ये संघर्ष सुरू; अध्यक्षांविरोधात निदर्शने, लष्कराचा संसदेला वेढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यक्ष अब्दुल्ला यामीन - Divya Marathi
अध्यक्ष अब्दुल्ला यामीन

माले- मालदीवमध्ये राजकीय संकट आणखी वाढले आहे. अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही आदेश मानू नका, असा आदेश सरकारने पोलिसांना दिला.


अॅटर्नी जनरलनी रविवारी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संदेश दिला. त्यात म्हटले आहे की, ‘अध्यक्षांवर महाभियोग लावून त्यांना पदावरून काढून टाकण्याचा किंवा त्यांना अटक करण्याचा आदेश घटनाविरोधी आणि बेकायदेशीर असेल. त्यामुळे घटनाविरोधी आदेशाचे पालन करू नये, असे आम्ही पोलिस आणि लष्कराला सांगितले आहे.’ दुसरीकडे, अध्यक्ष यामीन यांनी दोन दिवसांपूर्वीच नियुक्ती झालेले पोलिस प्रमुख अहमद सौघी यांना हटवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर रविवारी सार्वजनिक वक्तव्य करताना यामीन यांनी म्हटले आहे की, मी माझा कार्यकाळ संपण्याच्या आधीच निवडणूक जाहीर करू शकतो. यामीन यांचा कार्यकाळ नोव्हेंबरपर्यंत आहे.


सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक आदेश दिला होता. त्यात नऊ हजार राजकीय कैद्यांची सुटका करण्यास आणि १२ बडतर्फ संसद सदस्यांना पुन्हा नियुक्त करण्यास सांगितले होते. त्यामुळे संसदेत विरोधी पक्षांचे बहुमत झाले आहे. दरम्यान, अध्यक्षांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...