आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसऱ्याशी विवाह केला आणि आपल्या आजारी मुलाला सोडून निघून गेली. मात्र, 80 वर्षीय आजोबाने आपल्या नातूची साथ सोडली नाही. या आपल्या वयाची फिकीर न करता त्यांनी आपल्या नातूची सेवा केली. तेही एक दोन नव्हे, तर तब्बल 17 वर्षे त्याचे प्रत्येक काम हसतमुखाने केले. पण, गंभीर आजाराने त्या मुलाचा जीव घेतला. त्या मुलाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणाऱ्या या आजोबाची कहाणी अतिशय भावूक आहे.
- इंडोनेशियातील वेस्ट जावा येथे राहणारे टोटोन आणि त्यांच्या नातूची स्टोरी गतवर्षी मार्चमध्ये सर्वत्र चर्चेत आली. वयाची 80 वर्षे पार केलेले हे आजोबा हसत मुखाने गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या नातूची सेवा करत आहेत असे सांगण्यात आले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले होते.
- त्यांचा नातू स्यीफाला हाडांचा गंभीर आजा होता. त्यामुळे, त्याच्या शरीरातील सर्वच हाड ठिसूळ झाले होते. बसणे आणि चालणे तर दूर त्याला बोलता देखील येत नव्हते.
- स्यिफा फक्त 5 महिन्यांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. आईने सुद्धा मुलगा आजारी असल्याचे पाहता दुसरा विवाह केला आणि त्याला आजोबांच्या हवाली केले.
- अशात टोटोन आणि त्यांच्या पत्नीने त्या मुलाची काळजी घेतली. काही महिन्यातच टोटोन यांच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर त्यांनी एकटेच स्यीफाची काळजी घेण्यास सुरुवात केली. 17 वर्षे आपल्या आजारांशी झुंजणाऱ्या स्यीफाचा मृत्यू झाला आहे. त्या मुलाच्या मृत्यूनंतर साऱ्या जगातून आजोबांना सांत्वन दिले जात आहे. तसेच त्यांच्या या सेवेचे कौतुक केले जात आहे.
शेती करून भरायचे पोट
टोटोन एक सेवानिवृत्त सैनिक होते. पण, सरकारकडून त्यांना निवृत्ती वेतन मिळाले नाही. शेतीतून होणाऱ्या अल्पशा कमाईतून ते आपला आणि आपल्या नातूचा पोट भरायचे. गतवर्षी आजारी नातूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा सरकारने मदतीचे हात दिले होते. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या आजोबा आणि नातूचे आणखी काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.