आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराच्या नावे डॉक्टर करायचा लैंगिक शोषण, ती फक्त 13 वर्षांची होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकन जिमनॅस्ट मकायला मॅरोनीने प्रथमच आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितल्याप्रमाणे, एका डॉक्टरने तिच्यावर उपचाराच्या नावे लैंगिक शोषण केले होते. त्यावेळी ती फक्त 13 वर्षांची होती. त्या अमानुष डॉक्टरने तिच्यावर फिजिकल टेस्टच्या नावे 4 वर्षे बलात्कार केला. तिने यासंदर्भात आपल्या कोच आणि इतर सहकाऱ्यांनाही सांगितले. पण, झाले काहीच नाही. 


- लंडन ऑलिम्पिक्स 2012 मध्ये टीमसाठी गोल्ड आणि इंडिव्हिजुअल सिल्व्हर मिळवणारी अमेरिकन जिमनॅस्ट मिकायलाने 2016 मध्ये निवृत्ती घेतली. नुकतेच तिने यूएस टीव्ही एनबीसीला एक मुलाखत दिली. त्यामध्ये आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचा तपशील दिला. 
- यूएस ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना 2011 मध्ये फिजिकल टेस्ट निमित्त डॉक्टर लॅरी नासर आणि तिची पहिली भेट झाली होती. त्याचवेळी नासरने फिजिकल टेस्टचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी ती फक्त 13 वर्षांची होती. 
- लहान असल्याने आपल्यावर नेमका कोणता उपचार होत आहे हे तिला कळाले नाही. तरीही ती प्रचंड गोंधळली होती. जपानच्या वर्ल्ड टूर्नामेंट दरम्यान एका हॉटेल रुममध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी आपण जिवंत राहणारच नाही इतक्या वेदना झाल्याचे तिने सांगितले. 
- तिने हा प्रकार आपल्या कोचसह इतर सहकाऱ्यांना सुद्धा सांगितला. पण, कुणीच लक्ष दिले नाही. काही सहकाऱ्यांनी तर आपल्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार झाल्याचे तिला सांगितले. 
- तिच्या कोचपैकीच एकाला फिजिकल अब्यूज प्रकरणी यूएसए जिमनास्टिककडून निलंबित करण्यात आले होते. 


265 मुलींना लावले आरोप
- मकायला व्यतिरिक्त तिच्या 4 महिला सहकाऱ्यांनी सुद्धा लॅरी नासर विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले. यात 2017 मध्ये पहिला खुलासा करणारी मकायलाच होती. 
- मकायला 13 वर्षांची होती तेव्हापासूनच त्या डॉक्टरने तिच्यावर अत्याचार सुरू केला. 2012 च्या ऑलम्पिकमध्ये जेव्हा तिला आणि तिच्या टीमला गोल्ड व सिल्व्हर मेडल मिळाले, तेव्हा सुद्धा तिच्यावर अत्याचार झाले. 2016 मध्ये तिने निवृत्ती घेतली, तोपर्यंत तिच्यावर लॅरीने बलात्कार केला. 
- आतापर्यंत 265 तरुणी आणि महिलांनी नासरवर अत्याचाराचे आरोप लावले, मकायला त्यापैकीच एक आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...