आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्यूबा एअरलाइन्सचे विमान उड्डान घेताच कोसळले; 104 जणांचा मृत्यू, फक्त तिघे वाचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाना - क्यूबाच्या सरकारी एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी रात्री उड्डान घेताच कोसळले. या भीषण अपघातात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी हवाना येथील जोस मार्ती एअरपोर्टवर विमानाने उड्डान भरताच डुलकी घेतली आणि शेतात प्लेन क्रॅश झाले. या फ्लाइटमध्ये 104 प्रवासी आणि 6 चालक दल प्रवास करत होते. त्यापैकी फक्त 3 जण वाचले असून इतर 3 जणांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे.

 

घटनास्थळी पोहोचले राष्ट्रपती
- बोइंग 737 ने हवानाहून होलगुइनसाठी उड्डान घेतली होती. त्याचवेळी अचानक विमान शेतात कोसळले आणि काळोखाचे वादळ निर्माण झाले. 
- प्लेन क्रॅश झाल्याची माहिती राष्ट्रपती मिग्वेल डियाज-कॅनल यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विमानाची अवस्था पाहून भावनिक प्रतिक्रिया दिली. 
- मेक्सिकोच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, विमानाने उड्डान घेतल्यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि विमान थेट जमीनीवर आदळले. 
- हे विमान 1979 मध्ये बनवण्यात आले होते. मेक्सिकन कंपनी दामोज एअरोलाइन्सने क्यूबाची सरकारी विमान कंपनी क्यूबन डी एव्हिएशनला ते भाड्याने दिले होते. 


दोन दिवसांचा दुखवटा
विमान अपघातानंतर क्यूबामध्ये दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 2010 नंतर क्यूबात झालेला हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. गतवर्षी एका लष्करी विमानाच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2010 मध्ये एटीआर-72 विमान अपघातात 68 प्रवाश्यांच्या मृत्यूची नोंद झाली होती. 


पुढील स्लाइड्सवर, दुर्घटनास्थळाचे आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...