आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्येचे गूढ सोडवताना पोलिसांना फुटले घाम, मग समोर आले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीच्या राजधानीत शिर कापलेला धड पाहून लोकांमध्ये दहशत पसरली. त्यापैकी एकाने वेळीच पोलिसांना फोन लावून घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिकांशी विचारपूस आणि चौकशीला सुरुवात केली. देहाला मुंडके नसल्याचे पाहून पोलिस देखील चक्रावले. मग, जे सत्य समोर आले ते पाहून पोलिसांनी चक्क डोक्याला हात लावला. 

 

काय आहे प्रकरण?
- ही घटना साउथ जर्मनीतील आहे. येथे रेम्स नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका स्थानिकाला कथितरीत्या मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर शिर नव्हते.
- कथित मृतदेहावर पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांचे टी-शर्ट होते. तसेच डेनिम जीन्स घातला होता. त्याच्या कपड्यांवर सर्वत्र रक्ताचे डाग होते. 
- अनोळखी व्यक्तीचा खून करून कुणी फेकून दिले असावे अशा भितीने त्याने लोकांना एकत्रित आणले. तसेच पोलिसांना देखील फोन लावून याची माहिती दिली. 
- पोलिसांनी घटनास्थळी फायर ब्रिगेडसह पोहोचून परिसर सील केला. काही अधिकाऱ्यांनी स्थानिकांचे जबाब घेतले. तर काही डेडबॉडीजवळ गेले आणि तपास करण्यास सुरुवात केली.  शेवटी, कळाले की ही डेडबॉडी नसून शिर काढलेला एक पुतळा आहे. 

 

कुणी आणि का ठेवला?
इतके मोठे ऑपरेशन राबवूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे, पोलिस सुद्धा संतप्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आवाहन केले आहे, की अशी किळस आणणारी मस्करी करणाऱ्याची माहिती द्यावी. त्या व्यक्तीचा सुगावा मिळाल्यास वेळीच पोलिस स्टेशनला कळवावे.

बातम्या आणखी आहेत...