आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानशूर भिका-याची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, एका कर्माने बदलली LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मोठे मन कशाला म्हणतात याचा आदर्श या एका रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलाकडून घेता येईल. अगदी कळतही नव्हते, इतक्या लहान वयात आई-वडिलांना मुकलेल्या आणि रस्त्यांवर भीक मागून पोट भरणाऱ्या या मुलाची स्टोरी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. केन्यातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच पैसे मागत असताना तो एका कारकडे थांबला. कारचे ग्लास खाली आले, तेव्हा आतील दृश्य पाहून त्याला रडू कोसळले. आपण भिकारी आहोत म्हणून देवाकडे रोज तक्रार करतो. पण, आपल्याहून अधिक दुखी लोक सुद्धा या जगात आहेत याची जाणीव त्याला झाली. यानंतर त्याने जे काही केले ते कुणालाही अपेक्षित नव्हते. 


कोण आहे हा मुलगा?
> केन्यातील नायरोबी येथे राहणारा जॉन थो नेहमीप्रमाणे भीक मागून दोन वेळचे जेवण करतो. त्याला कुणाचाही आधार नाही. केन्यातील छोट्याशा शहरात जन्मलेल्या जॉनला काही कळतही नव्हते जेव्हा त्याच्या आईचे छत्र हरवले. आईच्या निधनानंतर वडिलांना दारुचे व्यसन लागले. रोज दारु पिऊन ते त्याला क्षुल्लक कारणांवरून बेदम मारहाण करायचे. समज आली तेव्हा तो घरातून पळून आला.
> नायरोबीसारख्या मोठ्या शहरात आला तेव्हा जेवणालाही कुणी विचारणारा नव्हता. नाइलाज म्हणून त्याने रस्त्यांवर भीक मागण्यास सुरुवात केली. कुठल्याही रस्त्यावर, सिग्नलवर थांबून पैसे मागणे आणि त्यातून जेवण खरेदी करणे ही त्याची दिनचर्या झाली होती. आपण किती कमी नशीबी आहोत याचा त्याला दररोज त्रास व्हायचा. या जगात आपल्यापेक्षा वाइट अवस्था कुणाचीच नाही असे त्याला वाटायचे. पण, एकेदिवशी सिग्नलवर त्याची भेट ग्लॅडीस या तरुणीशी झाली तेव्हा जॉनचे अख्खे आयुष्य बदलले. 


नेमके काय केले..?
> जॉन कारच्या काचेवर नॉक करून तो पैसे मागत होता. त्याचवेळी आत बसलेल्या ग्लॅडिस कमांडे या तरुणीने काच उघडली. आतमध्ये बसलेल्या ग्लॅडिसच्या गळ्याभोवती प्लास्टर होते. फुफ्फुस निकामी झाल्याने श्वास घेता येत नव्हते. कुठेही जाताना ती सोबत ऑक्सिजनची टाकी, जनरेटर आणि नळ्या सोबत घेऊन फिरायची. तिला जिवंत राहण्यासाठी 12 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. 
> ग्लॅडिसची अशी अवस्था पाहून जॉन इतका भावूक झाला की त्याला रडू कोसळले. रडतानाच त्याने आपल्या खिशांमध्ये हात टाकले आणि दिवसभर गोळा केलेली चिल्लर ग्लॅडिसला दिली. माझ्याकडे इतकेच पैसे आहेत आणि याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला असल्याचे त्याने सांगितले. मी भीक मागत असलो तरीही माझे हातपाय सुखरूप आहेत. पण, जगात असेही काही लोक आहेत ज्यांना श्वास सुद्धा घेता येत नाही. आपल्यापेक्षा वाइट परिस्थितही लोक जगत आहेत याची जाणीव त्याला झाली. 
> ग्लॅडिसची ही अवस्था त्याच्या माजी पतीने मारहाण करून केली होती. ही घटना डिसेंबर 2016 ची आहे. हा संपूर्ण प्रकार सिग्नलच्या शेजारीच बसलेल्या एका फोटोग्राफरने ऐकला आणि जॉन व ग्लॅडिसचा हात मिळवण्याचा फोटो टिपला. त्याने ही स्टोरी सोशल मीडियावर पोस्ट केली जी प्रचंड व्हायरल झाली. लोकांनी ग्लॅडिससाठी निधी गोळा करण्याकरिता कॅम्पेन सुरू केले. 
> सोशल मीडियावर स्टोरी व्हायरल झाल्यानंतर जगभरातून ग्लॅडिससाठी 80 हजार अमेरिकन डॉलरच्या देणग्या आल्या. त्यावरूनच तिला भारतात येऊन उपचार करणे शक्य झाले. त्या मुलाच्या एका कर्माने ग्लॅडिसचा जीव वाचला. 


पुढे वाचा, जॉन परमेश्वराने दिली सर्वात मोल्यवान भेट...?

बातम्या आणखी आहेत...