आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर 6 महिन्याला देश बदलणारा बेट, अजब आहे यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फ्रान्सने पुन्हा फीसंट आइलंड स्पेनला सुपूर्द केले तोही कुठल्याही युद्ध किंवा वाद नसताना. विशेष म्हणजे, 6 महिन्यांनंतर स्पेन हा 3000 चौरस मिटरचा बेट पुन्हा फ्रान्सला परत देणार आहे. ही परमपरा आज उद्याची नव्हे, तर तब्बल 350 वर्षांपासून सुरूच आहे. फ्रान्स आणि स्पेनला विभाजित करणाऱ्या नदीवर हा बेट वसला आहे. दर 6 महिन्याला देश बदलणाऱ्या या बेटाचे फॅक्ट अतिशय रंज आहेत. 

 

- फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर हेंडेई हे शेवटचे शहर आहे. फ्रान्सच्या बास्त बीचवर शेकडो सील जमा होतात. 
- दुसऱ्या कडेला एक मोठे डॅम आणि त्यानंतर स्पेनचे इरुण शहर आहे. ते शहर फ्रान्सच्या अगदी सीमेजवळच आहे. या दोन्ही शहरांमध्ये बिदासोआ नदी आहे. 
- फीसंट आइलंड याच नदीच्या मध्यभागी आहे. कुठल्याही प्रकारची लोकवस्ती नसल्याने आणि दोन्ही देशांच्या मध्यभागी वेगळा असल्याने तो कुठल्याही देशाचा ठराविक भाग नाही. 
- 1659 मध्ये फ्रान्स आणि स्पेनचे युद्ध संपले. त्याची बैठक याच बेटावर आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे, या बेटाला ऐतिहासिक महत्व आहे. 
- त्यावेळी झालेल्या शांतता कराराला पायनिस करार असेही म्हटले जाते. या करारासह एक शाही विवाहसोहळा देखील पार पडला होता. 
- फ्रान्सचे किंग लुइस 14 वे यांनी स्पेनचे किंग फिलिप चौथे यांच्या मुलीशी विवाह केला होता. यासोबत दोन्ही देशांमध्ये दर सहा महिन्याला एकमेकांना बेट देण्याचा करार झाला. 
- हे बेट 1 फेब्रुवारी ते 31 जुलै पर्यंत स्पेनकडे आणि उर्वरीत सहा महिने फ्रान्सकडे ठेवण्यावर एकमत झाले होते. तीच परमपरा आजही सुरू आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बेटाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...