आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीच्या अटकेबाबत हाँगकाँग घेऊ शकतो निर्णय, चीनची स्पष्टोक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - स्थानिक कायदे आणि परस्पर सहमतीच्या कायदेशीर करारांच्या आधारावर फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीला अटक करण्याची भारताची विनंती हाँगकाँग मंजूर करू शकतो, असे चीनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हाँगकाँग प्रशासनाकडे नीरव मोदीच्या अस्थायी अटकेसाठी विनंती केली आहे, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी गेल्या आठवड्यात संसदेला सांगितले होते.


भारताच्या विनंतीबाबतच्या एका प्रश्नावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग म्हणाले की, एक देश दोन धोरण आणि हाँगकाँग विशेष प्रशासन नियमानुसार हाँगकाँगचे प्रशासन इतर देशांसोबत परस्पर न्यायिक सहकार्याबाबत निर्णय घेऊ शकतो. अस्थायी अटक औपचारिकरीत्या प्रत्यर्पणासाठी विनंती करण्याच्या आधीची प्रक्रिया असते. त्यानंतर वाँटेड व्यक्तीला जेथे असेल तेथून ताब्यात घेता येते. गेंग म्हणाले की, भारताने योग्य प्रक्रियेद्वारे विनंती केली तर हाँगकाँग भारतासोबत झालेल्या न्यायिक करारांनुसार पायाभूत कायद्याचे पालन करेल असे वाटते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, नीरव मोदी हाँगकाँगमध्ये आहे. हाँगकाँग हे चीनचे प्रशासनिक क्षेत्र आहे.

बातम्या आणखी आहेत...