आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 5 कोटी लोकांचा जीव घेणारा Virus; निपाह यासमोर काही नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - केरळमध्ये निपाह नावाच्या व्हायरसने (विषाणू) दहशत माजली आहे. कुठल्याही प्रकारचे औषध किंवा लस नसलेल्या या रोगाने आतापर्यंत 12 जणांचा जीव घेतला. या व्हायरसवर अनेक अॅलर्ट जारी करण्यात येत आहेत. पण, 1918 मध्ये जगभरात कोट्यावधी लोकांचा जीव घेणाऱ्या व्हायरसपुढे निपाह काहीच नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात आलेल्या स्पॅनिश फ्लू नावाच्या व्हायरसने एकाच झटक्यात तब्बल 5 कोटी लोक मारले होते. हा आकडा पहिल्या महायुद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या तुलनेत 4 पट अधिक आहे. 


> आजपासून ठीक 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू नावाच्या व्हायरसने साऱ्या जगात दहशत माजला होता. सर्वप्रथम अमेरिकेत सुरू झालेला हा फ्लू यूरोप, आणि आफ्रीकेसह आशियात सुद्धा पोहोचला. 
> नॅशनल आर्काइव्हमध्ये असलेल्या नोंदीनुसार, या फ्लूने एका वर्षांत दोन टप्प्यांमध्ये जगभरात हल्ला केला. पहिल्या टप्प्यात लोकांना तीन दिवसांची ताप येण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. पीडित आजारातून सावरण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी हा फ्लू दुसरा अटॅक करतो. 
> दूसऱ्या हल्ल्यात पीडितची परिस्थिती इतकी गंभीर होते, की त्याच्या जिवंत वाचण्याची शक्यताच राहत नाही. या फैलाव होताच मृत्यूच्या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली. या रोगात अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये लोकांचा मृत्यू निश्चित होता. 
> व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यास पीडितांची स्किन निळी पडायची. फुफूस फुगत होते. जेणेकरून पीडितांना श्वसनात अडथळे यायचे आणि त्यांचा गुदमरून मृत्यू व्हायचा. फ्लूमुळे अमेरिकेत सर्वाधिक 6,75,000 नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली. 


आजार ओळखणेही कठिण
> डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि संशोधकांना हा आजार ओळखणेच सर्वात कठिण बनले होते. कारण, कुठलीही ठळक लक्षणे न दाखवताच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला. तसेच झपाट्याने मृतांची संख्या वाढली. अशात फ्लूवर नियंत्रण मिळवणे अशक्य बनले होते.
> त्यावेळी या व्हायरसवर उपचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस किंवा औषध उपलब्ध नव्हती. केवळ लोकांना सावध राहण्याचे सल्ले दिले जात होते. 
> लोकांना मास्क घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह, बिझनेस पूर्णपणे बंद करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी हा रोग फैलण्याची भिती असल्याने सभा संमेलने सुद्धा आयोजित केले जात नव्हते. 
> या रोगाने कुणालाच सोडले नाही. शहरांपासून ग्रामीण वस्त्या आणि समुद्र किनारे सर्वत्र ही रोगराई पसरली. घनदाट वस्ती असलेल्या भागांमध्ये हा फ्लू सर्वात झपाट्याने पसरला. अनेक व्हायरस तरुण आणि हेल्थी लोकांना घातक नसतात. ते प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्धांवर हल्ला करतात. पण, या फ्लूने कुणालाही सोडले नाही. 


रेस्पिरेटरी सिस्टिमवर व्हायचा हल्ला
हा व्हायरस रेस्पिरेटरी सिस्टिम अर्थात श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. आधुनिक युगात या व्हायरसला H1N1 नावानेही ओळखले जाते. हा व्हायरस खूप संक्रामक आहे. एखाद्याला याचा प्रादुर्भाव झाल्यास सर्दी, शिंका आणि श्वासन घेण्यात अडथळे निर्माण होतात. आसपासच्या सुगंधी सुद्धा त्याला येत नाहीत. त्याने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यास किंवा शिंकल्यास तो व्हायरस दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो.


पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पॅनिश फ्लूने जगाचे केले होते असे हाल...

बातम्या आणखी आहेत...