आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात कुख्यात गुप्तचर संस्था; इतक्या क्रूर पद्धतीने देतात यातना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयएवर प्रथमच महिला प्रमुखाची निवड करण्यात आली आहे. जीना हॅस्पेल आता सीआयएच्या प्रमुख झाल्या आहेत. त्यांनी माइक पॉम्पियो यांची परराष्ट्र मंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांची जागा घेतली आहे. या महिला अधिकाऱ्यावर कैद्यांना अमानवीय यातना आणि अत्याचार करण्याचे आरोप आहेत. 

 

त्यांनी आपल्या कार्यकाळात संशयित दहशतवादी म्हणून पकडून आणलेल्यांना 180 तास जागे ठेवणे, कपडे काढून अमानवीय यातना देणे आणि अतिशय क्रूर पद्धतीने टॉर्चर करणे असे प्रकार केले आहेत. झोप येताच त्यांना विजेचे झटके आणि डोळ्यात स्प्रे मारले जाते. इराक आणि अफगाणिस्तानात पकडल्या गेलेल्या संशयितांना अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमानवीय यातना देण्याचे फोटो, व्हिडिओ आणि रिपोर्ट्स जारी झाले. त्या अधिकाऱ्यांच्या यादीत हॅस्पेल यांचे नाव सर्वात वर होते.

 

मानवाधिकार संस्था ह्युमन राइट्स वॉचने सीआयएच्या चौकशी करण्याच्या पद्धतीला जगातील सर्वात क्रूर आणि अमानवीय म्हटले आहे. जगभरात व्हायरल झालेल्या कैद्यांवरील अत्याचाराच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ओबामा प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. यासंदर्भातील उल्लेख आंतरराष्ट्रीय समिती रेड क्रॉसच्या अनेक रिपोर्ट्समध्ये आला आहे. अनेक कैद्यांना फक्त संशयाच्या आधारे पकडण्यात आले. त्यांच्या नावाची कधीच नोंद झाली नाही. ते सध्या कुठे आहेत याची माहिती 2 दशकानंतरही त्यांच्या कुटुंबियांना मिळालेली नाही. त्यांनी वापरलेल्या यातनांच्या पद्धतीने आम्ही आपल्याला सांगत आहोत. 

 

नग्न करून केले जाते लज्जित
सीआयए अधिकारी कैद्यांची चौकशी करताना त्यांना लज्जित करण्यासाठी त्यांचे कपडे काढतात. 2005 मध्ये अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने या पद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सीआयएकडून दिल्या जातात इतक्या क्रूर यातना...

बातम्या आणखी आहेत...