आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात भारतीय महिलेचा खून, पतीला अटक करताच वाढली गुंतागुंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा सर्वप्रथम पतीवर संशय व्यक्त करून त्याला अटक करण्यात आली. मात्र, पतीच्या अटकेनंतर या प्रकरणात गुंतागुंत आणखी वाढली आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली तेव्हा या नवरा बायकोमध्ये कधीच भांडण झाले नाही. ते प्रेमाने राहत होते असे सर्वांनीच सांगितले आहे. 

 

घरातच सापडला मृतदेह
> भारतीय वंशाच्या फार्मासिस्ट जेसिका पटेल मिडल्सबोरो टाउनमध्ये रोमन रोडवर आपल्या पतीसोबत केमिस्ट शॉप चालवत होत्या. जेसिकाचा मृतदेह सोमवारी तिच्या घरातच सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर घाव आढळले आहेत. यानंतर संशयाच्या आधारावर पती मितेश पटेलला अटक करण्यात आली. पण, अद्याप तिढा सुटला नाही. 
> मितेशला अटक झाली, तरीही शेजाऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केला तसेच मितेश आणि पत्नी जेसिकामध्ये खूप बॉन्डिंग होती असे सांगितले. कुणीही त्यांना भांडताना कधीच ऐकले नव्हते. या दोघांची पहिली भेट मॅनचेस्टर येथे झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाह झाला. या जोपड्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाने पती तसे करूच शकत नाही अशी साक्ष दिली आहे. 
> केमिस्ट स्टोरवर पती आणि पत्नी दोघेही राहत असल्याने त्यांची सर्वच शेजाऱ्यांशी चांगली मैत्री होती. आसपासच्या परिसरातही परिचित असल्याने सगळेच या घटनेवर हैराण आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अनेकांचा जबाब घेतला पण, कुणीही पतीने हत्या केल्याच्या थ्योरीवर विश्वास करत नाही. त्यामुळे, खरंच पतीने हा खून केला आहे का? केला तरी त्याचे कारण काय असेल? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. 


कुटुंबीय काय म्हणाले?
जेसिकाच्या कुटुंबियांच्या वतीने क्लीव्हलंड पोलिसांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यानुसार कुटुंबीय म्हणाले, ''नेहमीच आपल्या मित्र आणि परिवाराच्या मदतीला धावून येणारी जेसिका आज या जगात नाही. एक सौम्य मुलीचे असे जाणे असह्य वेदना देत आहे. एक परिवार म्हणून आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आमचे विनंती आहे की आमच्या परिवाराच्या प्रायव्हेसी सन्मान ठेवावा. या दुःखातून सावरण्यासाठी आम्हाला वेळ द्या.''

 

बातम्या आणखी आहेत...