आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धनाढ्य देश, 60 वर्षांपूर्वी होता असा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात महागडे चलन असलेला देश कुवैतने 25 फेब्रुवारी रोजी आपला नॅशनल डे साजरा केला. जगातील सर्वात धनाढ्य देशांमध्ये गणल्या जाणारा कुवैत प्रामुख्याने तेलावर विसंबून आहे. कुवैतमध्ये यूएस-ब्रिटिश कुवैत ऑइल कंपनीने येथे तेलाचा शोध लावला होता. तेव्हा हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तेव्हापासूनच परदेशी कामगारांसाठी हे आवडते ठिकाण बनले आहे.

 

- 1919-20 मध्ये कुवैत-नजद युद्धामुळे सौदी अरेबियाने कुवैतशी व्यापार थांबवला होता. ही बंदी 1923 ते 1937 पर्यंत लागू होती. 
- ही बंदी उठल्यानंतर अमेरिकन-ब्रिटिश कुवैत ऑइल कंपनीने मोठ्या तेल साठ्याचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धामुळे या तेल उत्खननास उशीर झाला. युद्ध संपल्यानंतर तेल काढण्यास सुरुवात झाली. 
- यानंतर 1951 मध्ये मुख्य सार्वजनिक कार्य सुरू झाले. यामुळेच कुवैतच्या लोकांचे दैनंदिन आयुष्यमान उंचावले आहे. 
- 1952 मध्ये कुवैत पर्शियन गल्फ प्रांतात सर्वात मोठा तेल निर्यातक देश बनला. त्यानेच भारतासह, इजिप्त, आशिया आणि अफ्रिका खंडातील कामगार कुवैतकडे आकर्षित झाले. 
- 1946 ते 1982 कुवैतसाठी सुवर्ण काळ होता. ऑइल क्षेत्रात विकासानंतरच ब्रिटिश राजवटीतून या देशाची मुक्तता झाली. 
- 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेख अब्दुल्लाह अल सलीम अल सबाह येथील शाह बनले. देशात सादर करण्यात आलेल्या संविधानाला संसदेने 1963 मध्ये मंजुरी दिली. 
- 1960-70 च्या दशकातच कुवैत एक धनाढ्य आणि विकसित देश बनला होता. आज कुवैती दिनार जगातील सर्वात महागडे चलन आहे. एका दिनारची किंमत 215 रुपये आहे. अर्थातच एका कुवैती दिनारच्या बदल्यात 3.5 डॉलर मिळतील. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 60 वर्षांपूर्वी असा होता कुवैत...

बातम्या आणखी आहेत...