आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात कारमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका शक्य : ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत आयात होणारी वाहने, ट्रक अाणि वाहनांच्या सुट्या भागांची चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे विदेशात निर्मिती होणाऱ्या वाहनांवर नवीन कर लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


  /> ट्रम्प यांनी अमेरिकी वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांना या संबंधित निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर कार आयातीवर १९६२ च्या व्यापार विस्तार कायद्यांतर्गत नवीन कर टॅरिफ आणि बंदी घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रॉस यांच्याशी अमेरिकेतील वाहन उद्योगाच्या सद्य:स्थितीबाबतही चर्चा केली. याच वर्षी या कायद्याचा आधार घेत ट्रम्प प्रशासनाने स्टीलवर २५ टक्के तर अॅल्युमिनियमच्या आयातीवर १० टक्के कर वाढ केली होती. या व्यतिरिक्त चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात वाढ करण्याचीही धमकी दिली होती. कर वाढीचा निर्णय तपास अहवालानंतर घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वाहन क्षेत्रातील या आयातीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका तर पोहोचत नाही ना, या संबंधीचा तपास करण्याचे निर्देश ट्रम्प यांनी दिले आहेत. वाहन आणि वाहन उपकरणे सारखा प्रमुख उद्योग क्षेत्र देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकी सरकारच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी देशात १.२० कोटी कार आणि ट्रकची निर्मिती झाली तर ८३ लाख वाहनांची आयात करण्यात आली अाहे.  


आयातीमधून सुरक्षेला धोका अवघड - युरोपियन युनियन  : डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत युरोपियन युनियनने कार अाणि वाहनांच्या सुट्या भागातून राष्ट्रीय सुरक्षेला कशा पद्धतीने धोका निर्माण होईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे अॅटलांटिक परिसरातील व्यापार आणि टॅरिफवर वाईट परिणाम होईल.

 

असा हवाला देत अमेरिकेने एकांगी कर वाढ केल्यास, हा निर्णय डब्ल्यूटीओच्या नियमांच्या विरोधात असेल असेही युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष जर्की कॅटाइनन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचा हा तर्क निराधार आणि समजण्यापलीकडचा असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...