आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यात लग्नच करणार नाहीत पुरुष! अशा बाहुल्यांना बनवणार पार्टनर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनात मनुष्य इतका पुढारला आहे, की भविष्यात विवाह संस्कृतीच नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. सेक्स रोबो आणि सेक्स डॉल आता केवळ कल्पनेपुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत. अगदी महिलांसारखे ते पुरुषांशी संवाद साधू शकतात. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही गरजा पूर्ण करू शकतात असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, कित्येक कंपन्या ऑर्डरनुसार कुठल्याही प्रतिष्ठित सेलिब्रिटीची हुबेहूब प्रतिकृती म्हणून सेक्स रोबो तयार करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या सेक्स रोबो कामुक हावभाव आणि सेक्शुअल भावना देखील व्यक्त करतात. त्या इतक्या खऱ्या-खुऱ्या वाटतात लोक त्यांच्या प्रेमात पडत आहेत. 


64 वर्षीय जेम्स पडला सेक्स रोबोच्या प्रेमात
अॅटलांटा शहरात राहणाऱ्या 64 वर्षीय जेम्सचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या वयात तो प्रेमात पडला आहे, तोही एका सेक्स डॉलच्या... ती एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स असलेली रोबो आहे. जेम्सने ही डॉल जेव्हापासून घरात आणली, तेव्हापासून ते निर्णय घेऊ शकत नाहीत की त्यांना ही डॉल हवी आहे, की 36 वर्षीय पत्नी... वैवाहिक जीवनातही सेक्स डॉल सवत ठरू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. 

 

वेश्यालयांमध्येही सेक्स डॉल
बार्सेलोना शहरात नुकतेच एक सेक्स डॉल वेश्यालय उघडले आहे. विशेष म्हणजे, एकही स्त्री नसलेल्या या वेश्यालयात पुरुष गर्दी करत आहेत. त्यामुळे, सेक्स डॉलचे भविष्य किती व्यापक आहे त्याचे हे ठिकाण एक जिवंत उदाहरण मानले जात आहे. केवळ वेश्यालयेच नव्हे, तर या सेक्स रोबोंमुळे पॉर्न इंडस्ट्रीवर सुद्धा संकट ओढावले आहे. पॉर्न स्टार Ela Darling च्या मते, सेक्स डॉल बाजारात आल्याने अनेकांना त्याचे कुतुहल वाटत आहे. लोक त्यांना पसंत करत आहेत, आकर्षित होत आहेत. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीवर सुद्धा संकट ओढावू शकते अशी भिती वर्तवली जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या सेक्स रोबो आणि डॉलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...