आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे महिन्यात नव्या अँड्राॅइडची आवृत्ती आयफोनला आव्हान देणार;अँड्राॅइडची 10 वी आवृत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- गुगलने आपली ऑपरेटिंग सिस्टिम अँड्राॅइडची नवी आवृत्ती (व्हर्जन) लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. गेल्यावर्षी गुगल हे अँड्राॅइड ९.० तयार करण्यासाठी काम करत होते. आतापर्यंत गुगल अँड्राॅइड-पी नावाने त्याची ब्रँडिंग करत आहे. नव्या आवृत्तीचे नाव पिस्टोचिया आइस्क्रीम असून ते मे महिन्यात बाजारात येईल, असा दावा प्रसारमाध्यमांच्या वृत्तात करण्यात आला आहे. अँड्राॅइड- पी नावाने बाजारात आले होते तेव्हापासून युजर्सनी त्याच्या पूर्ण नावाबद्दल विविध अंदाज बांधले होते. सोशल मीडियावर त्यास अँड्राॅइड पाइनापल, अँड्राॅइड पाॅइंटसारखी नावे दिली होती. खाद्यपदार्थांवर नाव ठेवली जाणारी ही अँड्राॅइडची १३ वी आवृत्ती आहे. याआधी गुगल डोनट, एक्लेयर, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, जिंजर ब्रेड, आइस्क्रीम सँडविच व ओरिओ यासारख्या नावांनी अँड्राॅइड आवृत्ती बाजारात आली आहे.

 

पिस्टोचिया ९.० सोबत गुगल अॅपल आयफोन-एक्सशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. आयफोनचे वैशिष्ट्ये असलेले मल्टिपल स्क्रीन, फोल्डिंग डिस्प्ले फीचर या अँड्राॅइड आवृत्तीत  असू शकतात. अँड्राॅइड ओएससाेबत मल्टी विंडो फोन तयार करण्यावर आतापर्यंत विशेष लक्ष दिले जात नाही. यासोबत पिस्टोचियामध्ये बॅटरी लाइफ वाढवण्यावरही भर दिला जात आहे. चित्र सेव्ह करण्यासाठी त्यात हाय इफिशिएन्सी इमेज फॉर्मेटचा पर्याय दिला जाऊ शकतो. याच्या साहाय्याने आधीपेक्षा छायाचित्राचा दर्जा दीडपट चांगला मिळू शकतो. पिस्टोचिया अपडेट सर्वात आधी गुगल पिक्सल डिव्हाइसवर उपलब्ध असेल.

 

ओरिओच्या खराब प्रदर्शनाच्या नुकसान भरपाईची आशा  
अँड्राॅइडचे मागचे अपडेटने चांगली कामगिरी करू शकले नाही. अँड्राॅइड बाजारात ओरिओचा वाटा १ टक्क्याहून कमी आहे. याचे वर्षभराच्या आत नवे व्हर्जन आणून गुगल याआधीच्या नुकसानीची भरपाई करू इच्छित आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या पाच व्हर्जनचे अँड्राॅइड बाजारात सर्वात जास्त युजर... 

 

बातम्या आणखी आहेत...