आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर क्राईममुळे 2017 मध्ये जगाला 39 लाख कोटींचे नुकसान; फसवणुकीमुळे 29 लाख कोटींचा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- जगभरात सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्याचा गतवर्षी एकूण ३९ लाख कोटींचा फटका बसला आहे, असा दावा ग्लोबल सायबर सेक्युरिटी फर्म मॅकएफी व सेंटर फॉर स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनलस्टडीजने (सीएसआयएस) आपल्या अहवालाद्वारे केला आहे. सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात रशियाचा क्रमांक अव्वल आहे. रशियाचे हॅकर्स पश्चिमेकडील देशांचे जास्त नुकसान करत आहेत. 


सायबर गुन्हेगारीत रशियानंतर उत्तर कोरियाचा क्रमांक लागतो.सायबर गुन्हेगारीत रशियानंतर उत्तर काेरियाचा क्रमांक लागतो. उत्तर कोरिया सायबर गुन्हेगारीतून मिळणारा पैसा क्रिप्टोकरन्सी अर्थात ऑनलाइन मुद्रेतून सरकारला बळकट करण्यासाठी वापरतो. २०१७ मध्ये जगभरात झालेल्या वन्नक्राई रॅनसमवेअर सायबर हल्ल्यातही अमेरिकेच्या तपासात उत्तर कोरियाला आरोपी ठरवण्यात आले होते. रशिया आणि उत्तर कोरियाशिवाय सायबर गुन्हेगारीतील देशांत ब्राझील, भारत व व्हिएतनामचेही नाव आहे. चीन सायबर हेरगिरीत अव्वल मानला जातो.

 

१५० देशांचे संगणक बंद, बिटकॉइनमध्ये खंडणी
गेल्या वर्षी मे मध्ये सायबर गुन्हेगारीद्वारे एकाचवेळी अनेक देशांच्या संगणकांना हॅक करून रॅनसमवेयर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संगणकांना लॉक करण्यात आले होते. संगणक सुरू करण्यासाठी खंडणीच्या रुपाने बिटक्वॉईनची मागणी करण्यात आली होती. त्यावेली १५० देशांतील दोन लाखाहून अधिक संगणकांना त्याचा फटका बसला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...