आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन यांच्यात शीतयुद्धासारखी स्थिती; अमेरिकेच्या परराष्ट्रविषयक जाणकाराचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भारत-चीन यांच्यात शीतयुद्धासारखे संबंध आहेत. पूर्वी दोन्ही देशांत बळकट व्यापारी संबंध होते. परंतु चीनसोबतच्या व्यापार संबंधावर भारत समाधानी नव्हता, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र विषयक तज्ज्ञ एलिसा एरिस यांनी केला आहे. दोन्ही देशांतील संबंध शीतयुद्धासारखे निर्माण झाले आहेत. आता त्यांच्यातील व्यापारी संबंध दुय्यम झाले आहेत. भारतीय उपखंडात चीनची आक्रमकता वाढू लागली आहे. त्यावरून भारत चिंतित आहे. कारण चीनने पाकिस्तान, श्रीलंकेसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशांत चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारचे चीनचे आक्रमक धोरण भारताला आवडलेले नाही. भारताला चीनकडून ही अपेक्षा नाही. असे असले तरी भारत आपले हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हे संबंध ताणले आहेत,असे एरिस यांनी सांगितले.  


जागतिक नियमांना भारताचे समर्थन  
भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. अशा व्यवस्थेचे जोरदारपणे समर्थन केले आहे. परंतु भारत-चीन यांच्यात अनेक क्षेत्रात भागीदारी आहे. अशा परिस्थितीत भारतासमोर चीनसोबतचे संबंध कसे ठेवावेत, असादेखील पेच निर्माण झालेला आहे, असे एरिस यांनी सांगितले.  


ब्रिक्स भारताच्या सक्रियतेचे उदाहरण  
ब्रिक्स देशांची विकास बँक आहे. पाच देश मिळून चांगले काम करू लागले आहेत. त्यामागे भारताची सक्रियता कारणीभूत ठरली आहे. कागदावरील संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यामागे भारताचे मोठे योगदान आहे, अशा शब्दांत एरिस यांनी भारताचा गौरव केला.  

बातम्या आणखी आहेत...