आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

India महिलांसाठी सर्वात असुर‍‍िक्षित, पाकिस्तान 6 व्या क्रमांकावर; \'द थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन\'चा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - महिला संरक्षणाच्या बाबतीत सर्वात घातक देशांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यात भारताला महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश ठरवण्यात आले आहे. घातक देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद आणि यादवीग्रस्त देश अफगाणिस्तान आणि सीरिया अनुक्रमे  आतंकवाद से प्रभावित अफगानिस्तान और युद्धग्रस्त सीरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे, दहशतवादाची फॅक्ट्री मानल्या जाणारा पाकिस्तान यादीत महिलांसाठी भारतापेक्षा सुरक्षित ठरवण्यात आला आहे. या देशाचा क्रमांक 6 वा आहे. तर जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र अमेरिका या बाबतीत 10 वा सर्वात असुरक्षित देश आहे. 


कुणी केले हे सर्वेक्षण..?
हे सर्वेक्षण 'द थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन' ने जारी केला आहे. यामध्ये महिलांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या संस्था आणि संघटनांसह कार्यकर्ते अशा 550 तज्ञांची मते घेण्यात आली आहेत. या सर्वेक्षणात 193 देशांमध्ये महिलांचे अधिकार, त्यांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना इत्यादींवर सर्वात घातक असलेल्या 10 देशांची यादी काढण्यात आली आहे. त्याच यादीमध्ये भारत सर्वात घातक देश ठरला आहे. 


का सर्वात घातक आहेत हे 5 देश?
1. भारत
यासाठी तीन कारणे देण्यात आली आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. नॅशनल क्राइम ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, येथे दररोज लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या 100 घटनांच्या तक्रारी येत आहेत. या व्यतिरिक्त सांस्कृतिक आणि पारंपारिक रुढी तसेच महिलांची वाढती तस्करी इत्यादींना कारणीभूत ठरवण्यात आले आहे. 


2. अफगाणिस्तान
महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, हिंसाचारामुळे अफगाणिस्तान दुसरा सर्वात घातक देश आहे. येथे महिलांना आरोग्यासाठी सुविधा आणि त्यावर होणारा खर्च सुद्धा नाहीच्या बरोबरीला आहे. 


3. सीरिया
गेल्या 7 वर्षांपासून हा देश दहशतवाद, युद्ध आणि यादवीने ग्रस्त आहे. येथे महिलांची अवस्था अतिशय दयनीय आहे. महिलांना सामान्य आरोग्य सुविधा सुद्धा प्रदान केल्या जाऊ शकत नाहीत. 


4. सोमालिया 
1991 पासून हा देश यादवीग्रस्त आहे. यात महिला स्वतःला असुरक्षित मानतात. रुढी आणि परंपरेच्या नावाने महिला त्रस्त आहेत. 


5. सौदी अरेबिया
कामकाजाच्या ठिकाणी महिलांसोबत भेदभाव केला जातो. सांस्कृति आणि धार्मिक कारणे दाखवून महिलांना डावलले जाते. त्यामुळे, या ठिकाणी राहणाऱ्या महिला स्वतःला असुरक्षित मानतात. 


सहाव्या क्रमांकावर आहे पाकिस्तान
सांस्कृतिक आणि धार्मिक रुढी परंपरा, ऑनर किलिंग आणि कौटुंबिक हिंसाचार इत्यादींमुळे येथील महिलांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे, या देशाला सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.


अमेरिका 10 व्या क्रमांकावर का?
गेल्या वर्षी सोशल मीडियावर #MeToo मोहिमेची सुरुवात अमेरिकेतूनच झाली होती. हजारो महिलांनी या हॅशटॅगसह आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी मांडली होती. त्यामुळेच, अमेरिका यादीत 10 व्या क्रमांकाचा देश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...