आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका, आफ्रिकेतही प्रजासत्ताक दिन; ब्रिटनमधील राजदूत कार्यालयांमध्येही समारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन अमेरिका, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांत साजरा करण्यात आला. रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटनमधील राजदूत कार्यालयांत या निमित्ताने विविध समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयातदेखील शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आले होते.  


संयुक्त राष्ट्र व भारतीय उच्चायुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूयॉर्कमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निकी हॅले यांच्या वतीने ताे मुत्सद्दी कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला भारतवंशीय अनेक अमेरिकी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारताचे स्थायी प्रतिनिधी सयद अकबरुद्दीन यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला  मिरोस्लोव्ह लॅजॅक, अमिना जे. मोहंमद, मलिहा लोढी इत्यादी मान्यवरांचा समावेश होता. याप्रसंगी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.  सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, ह्युस्टन, अटलांटा शहरातही प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम झाले. 

 

राजदूत कार्यालयात ध्वज फडकला  
भारतीय-अमेरिकी समुदायाच्या उपस्थितीत राजदूत नवतेज सिंग सरना यांच्या हस्ते वॉशिंग्टन राजदूत कार्यालयात तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  

 

जोहान्सबर्ग शहरातही तिरंगा  
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातदेखील तिरंगा फडकला. प्रजासत्ताकदिनी भारतवंशीय समुदायाने देशभक्तीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती वाणिज्य दूत के.जे. श्रीनिवास यांनी दिली.  


आफ्रिकेला ह्रदयात स्थान  
भारत आणि आफ्रिका यांच्यात तत्त्वज्ञानाच्या पातळीवर अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्या अर्थाने आफ्रिका भारताच्या हृदयात स्थान आहे. त्यामुळेच हे संबंध निकटचे आणि विशेष आहेत. त्यामुळेच उभय देश भविष्यातदेखील परस्परांना मदत करतील, अशी अपेक्षा श्रीनिवास यांनी व्यक्त केली.  

बातम्या आणखी आहेत...