आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवस गायब होती महिला, अजगराला कापल्यानंतर समोर आले Shocking सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुलावेसी - इंडोनेशियातील हे दृश्य मनाला विचलित करू शकते. येथील स्थानिकांनी एका अजगराचे पोट चिरून त्यातून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे. तब्बल 27 फूट अजगराने या महिलेला जिवंतच गिळले होते. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, त्यावेळी तिच्या देहावर कुठेही जखमेच्या खुणा नव्हत्या. सोबतच तिच्या शरीरावर अंगभर कपडे जशास तसे होते. गावकऱ्यांनी या अजगराला पकडून एकत्रितपणे त्याला चिरले आहे. 


3 दिवसांपासून होती बेपत्ता...
> मूना जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी अगुंग रामोस यांनी सांगितले, महिलेचे नाव तीबा असून तिचे वय 54 वर्षे होते. तिला शेवटचे गेल्या गुरुवारी घरातील अंगणात पाहण्यात आले होते. 
> त्याच दिवशी रात्रीपासून ती बेपत्ता झाली होती. सकाळी सुद्धा काहीच पत्ता न लागल्याने नातेवाइक आणि स्थानिकांनी तिचा शोध सुरू केला. 
> आईचा शोध घेणाऱ्या दोन मुलांना झाडांमध्ये काही संशयास्पद लपून बसल्याचे कळाले. त्या झाडांच्या जवळ गेले असता त्यांना आपल्या आईच्या सँडल, कुऱ्हाड आणि टॉर्च सापडले. 
> यानंतर जवळच 27 फुट लांब असे अजगर बसलेले होते. त्याचे पोट पूर्णपणे फुगले होते. अर्थातच त्याने शिकार केली होती, पण पचन होत नसल्याने तो एका ठिकाणी शांत बसला होता. 
> महिलेच्या मुलांनी जेव्हा पोलिसांना बोलावले तेव्हा, शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यांनीच त्या अजगाराला ठेचून मारले. यानंतर सर्वांनी मिळून अजगराचे पोट चिरले आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचे शिर अजगराच्या शेपटीच्या दिशेने होते, तर पाय अजगराच्या तोंडाकडे. अर्थातच त्याने या महिलेले शिरापासून गिळंकृत केले होते. 
> या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण पसरले आहे. महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहून अख्ख्या गावाला रडू कोसळले. हे दृश्य सर्वांसाठीच एका हॉरर चित्रपटाचे प्रत्यक्ष रूप होते. आपल्यासोबतही असे घडू शकते अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे. गावकऱ्यांनी भीतीनेच सार्वजनिक प्रार्थनेचे आयोजन केले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...