आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLAST: कॅनडात बॉम्बे भेळ रेस्तराँमध्ये भीषण स्फोट; 15 जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरंटो- कॅनडातील आँटेरियोमधील बॉम्बे भेळ या भारतीय रेस्तराँमध्ये भीषण स्फोट झाला आहे. स्फोटात 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना टोरंटो ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

आँटारियोमधील हुरोंटारियो स्ट्रीट आणि एग्लिटन एव्हेन्यूजवळील बॉम्बे भेळ नामक भारतीय रेस्तराँमध्ये हा स्फोट झाला.   स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचली अाहे. स्फोट झाला तेव्हा बॉम्बे भेळमध्ये किती लोक होते, हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी चौकशीसाठी रेस्तराँ सील केले आहे.  

 

पोलिसांनी चेहरा झाकलेल्या दोन संशयितांचे फोटो 'ट्विटर'वर शेअर केले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कॅनडातील भारतीय रेस्तराँमधील स्फोटाची भीषता दर्शवणारे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...