आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धात गमावले दोन्ही हात, आता मिळाला आभाळाएवढा आनंद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराक युद्धाचा भयावह चेहरा म्हणून 2003 मध्ये जगभरात गाजलेला मुलगा आता 27 वर्षांचा झाला आहे. एकेकाळी इराकमध्ये आपल्या कुटुंबियांसह राहणाऱ्या अली अब्बासच्या घरावर अचानक एक मिसाइल येऊन कोसळले. या हल्ल्यात त्याचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अली अब्बास तर वाचला पण, त्याचे दोन्ही हात कापावे लागले. त्यावेळी अब्बास 12 वर्षांचा होता. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अब्बासला नुकतीच आनंदाची बातमी मिळाली. तो बाप बनला. आपल्या लेकरुला तो हातात घेऊ शकला नाही. तरीही त्याने हजारो किमींचा प्रवास करून आपल्या बाळाला छातीवर झोपवले आणि त्याच्या हृदयाची स्पंदनं त्याने अनुभवली. यात त्याला जो आनंद मिळाला तो आभाळाइतका होता. काय आहे, अली अब्बासची संपूर्ण कहाणी हे आम्ही आज आपल्याला सांगत आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अली अब्बास आणि त्याच्या बाळाची संपूर्ण कहाणी ग्राफिक्समध्ये...

बातम्या आणखी आहेत...