आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी लोकांनी दिल्या ‘चप्पलचोर पाक’च्या घोषणा! पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निषेध व्यक्त करणारे लोक. त्यांच्या हातात अनेक बॅनर आणि प्लेकार्ड्स होते. त्यावर लिहिले होते, चप्पल चोर पाकिस्तान आणि पाकिस्तानचा बूट दान करण्याची गरज आहे. - Divya Marathi
पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निषेध व्यक्त करणारे लोक. त्यांच्या हातात अनेक बॅनर आणि प्लेकार्ड्स होते. त्यावर लिहिले होते, चप्पल चोर पाकिस्तान आणि पाकिस्तानचा बूट दान करण्याची गरज आहे.

वॉशिंग्टन- कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण अमेरिकेपर्यंत पोहोचले आहे. भारत, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या नागरिकांनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली. ‘चप्पलचोर पाकिस्तान’ अशा घोषणाही देण्यात आल्या. 


मोर्चेकऱ्यांनी दूतावासाला जुन्या चपला दान केेल्या. ‘पाकिस्तान अमेरिकेकडून डॉलर्स घेतो व भारताकडून जोडे खातो,’ असे फलकही मोर्चेकऱ्यांनी या वेळी झळकावले. आंदोलनाचे नेते तथा अमेरिकन फ्रेंड्स ऑफ बलुचिस्तानचे संस्थापक अहमद मुस्तिखान म्हणाले की, न्याय मिळवण्याचा कुठलाही अधिकार जाधव यांना सुनावणीवेळी मिळालेला नाही. पाकिस्तानने हिंदू महिलांच्या धार्मिक आणि विश्वासाच्या प्रतीकांचा अपमान केला आहे. पाकिस्तान जर एका महिलेचे जुने जोडे चोरू शकतो तर आम्ही दिलेले जुने जोडेही वापरू शकतो, असे एका आंदोलनकर्त्याने म्हटले.


पाकिस्तानला बुटांचे दान 
- पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर आंदोलन करणाऱ्यांच्या हातात अनेक बॅनर आणि प्लेकार्ड्स होते. त्यावर लिहिले होते, चप्पल चोर पाकिस्तान आणि पाकिस्तानचा बूट दान करण्याची गरज आहे.  
- आंदोलन करणाऱ्यांनी शूज आणि स्लिपर्सच्या अनेक जोड्या पाकिस्तान दुतावासाबाहेर एक बोर्ड लावून त्यासमोर ठेवल्या. पाकिस्तानला आता फक्त बूट आणि चपलांची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 


जाधव यांच्या कुटुंबीयांबरोबर 
- आंदोलनात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने म्हटले, जर ते एखाद्या दुःखी महिलेची चप्पलही चोरू शकतात तर ते काय नाही करू शकत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी बूट चपला आणल्या आहेत. यातून त्यांची गरज भागेल असे वाटते. 
- दुसऱ्या एकाने म्हटले, पाकिस्तान फार वाईट विचार करणारा देश आहे. 


जाधव कुटुंबाबरोबर नेमके काय घडले?
- पाकिस्तानच्या मंजुरीनंतर 25 डिसेंबरला जाधव यांची पत्नी आणि आई त्यांना भेटायला इस्लामाबादेत गेल्या होत्या. 
- भेटीच्या आधी या दोघींची तपासणी करण्यात आली. त्यावेळी टिकली, मंगळसूत्र, बांगड्या आणि बूटही पाकिस्तानने काढून घेतले. भेट सुामरे 44 मिनिटे चालली. त्यानंतर पाकिस्तानने बूट वगळता सर्व सामान परत केले होते. 
- पाकिस्तान सरकारने म्हटले, बुटामध्ये हेरगिरीशी संबंधित काही उपकरण (कॅमेरा किंवा ऑडियो चीप) असल्याची आम्हाला शंका आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, पाकिस्तानच्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांबरोबरच्या वर्तनाविषयी सुषमा स्वराज यांचे निवेदन आणि पाकिस्तानच्या पत्रकारांचे गैरवर्तन...

बातम्या आणखी आहेत...