आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुडे वडील, आईचे दुसरे लग्न; असा घडला इतिहासातील सर्वात धनाढ्य उद्योजक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अॅमेझॉनचे संस्थापक सीईओ जेफ बोझोस जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केल्यास ते इतिसाहातील सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने 2018 च्या आकडेवारीत त्यांना सर्वात धनाढ्य उद्योजक म्हटले होते. आता फोर्ब्सच्या नव्या यादीतही ते इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूणच तब्बल 112 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती आहे. विशेष म्हणजे, त्यांनी गेल्या वर्षभरातच 39 अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई केली. त्यांना सर्वाधिक उत्पन्न अॅमेझॉन कंपनीच्या 78 लाख शेअर्समधून मिळतो.

 

जगाच्या इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरलेले जेफ बेझोस यांचा संघर्ष काही सोपा नव्हता. अगदी लहानपणापासूनच अॅक्टिव्ह राहिलेले जेफ आपल्याच घरातील खेळणी आणि उपकरणे उघडून पुन्हा दुरुस्त करायचे. त्यांचे वडील दारुडे होते. त्यामुळे जेफच्या आईने घटस्फोट घेऊन दुसऱ्यासोबत संसार थाटला. त्यावेळी जेफ बेझोस फक्त 4 वर्षांचे होते.

 

पुढे, जाणून घ्या इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्तीबद्दल काही महत्वाचे फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...