आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलंगाला उपाशीपोटीच बांधले होते 12 भाऊ-बहिणी, आई-वडीलच द्यायचे अशा यातना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात आई-वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. डेव्हिड टर्पिन (57) आणि लुइस टर्पिन (49) या कपलला अटक करण्यात आली आहे. या दोघांवर आपल्याच पोटच्या 13 मुला-मुलींना नरक-यातना दिल्याचे आरोप आहेत. डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज घेऊन दिवाळखोर झालेले हे आई-वडील आपल्या लेकरांना कित्येक दिवसांपासून उपाशी ठेवत होते. कुणीही ओरडू नये आणि शेजाऱ्यांना कळू नये यासाठी त्यांनी सर्वांच्या तोंडावर पट्ट्या लावून पलंगाला साखळ्यांनी बांधले होते. त्या सर्वांचे वय 2 वर्षे ते 29 वर्षे दरम्यान होते. काही दिवसांपूर्वीच या नरकातून एक 17 वर्षीय मुलगी पळून जाण्यात यशस्वी ठरली. तिनेच आपल्या-भाऊ बहिणींची सुटका केली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 भाऊ बहिणींसाठी हिरो ठरली एक मुलगी आणि आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...