आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काऱ्यांच्या डोक्यात नेमके कोणते विचार येतात, वाचा खळबळजनक तथ्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - कठुआ बलात्कार प्रकरणी अख्ख्या देशात संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या 8 वर्षांच्या मुलीवर कुणी इतका पाश्वी अत्याचार करूच कसा शकतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बुद्धीभ्रष्ट झालेल्या अशा नराधमांच्या डोक्यात नेमके काय चालत असेल. त्या निमित्त ब्रिटनमध्ये असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा अभ्यास आम्ही येथे मांडत आहोत. लंडनच्या एका विद्यापीठात मधुमिता पांडेय या विद्यार्थिनीने नुकताच एक शोधनिबंध लिहून पूर्ण केला. गुन्हेविज्ञानाची विद्यार्थिनी मधुमिता 22 वर्षांची होती, तेव्हा तिने तिहार जेलमध्ये कैदेत असलेल्या तब्बल 100 रेपिस्ट्शी चर्चा केली होती. कैद्यांवर केलेल्या या रिसर्चमधून खळबळजनक तथ्ये समोर आली. 

 

हा विचार असतो रेपिस्टच्या डोक्यात...
- 2013 मध्ये निर्भया गँगरेप नंतर National Crime Records Bureau नुसार 2015 मध्ये 34 हजार 651 बलात्कारांची नोंद झाली. जर प्रत्येक घटना नोंदवली असती तर हा आकडा आणखी फुगला असता. भारतात अनेक लोक गुन्हा घडल्यानंतर मौन बाळगतात. बदनामीमुळे त्याची कुठेही वाच्यता करत नाहीत. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मधुमिताने आपल्या स्टडीमध्ये या विषयाशी निवड केली. मधुमिताच्या अभ्यासात रेपिस्टच्या डोक्यात घोळणारे अनेक विचार समोर आले. 
- मधुमिताने जेव्हा बलात्काऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा अनेक वेळा सुन्न झाली. तिच्या मते, रेपिस्ट माणसे नसतात, त्यांना तुम्ही हिंस्र पशू म्हणू शकता. 100 पैकी खूप कमी लोकांमध्ये आपल्या गुन्ह्याबद्दल अपराध बोध होता. खूप कमी कैद्यांना याबाबत पश्चात्ताप झालेला दिसला.
 
रूढी-परंपरा आहे मुख्य कारण
- मधुमिताने आपल्या रिसर्चमध्ये काही अपराध्यांना प्रश्न विचारल्यावर आढळले की, ते अशिक्षित असण्याबरोबरच अश्लील आणि असामाजिकही होते. मधुमिता म्हणाली- त्यांचे पालनपोषण अविकसित समाजात झालेले होते. तेथील वातावरणामुळे त्यांना स्त्री म्हणजे फक्त भोगाची वस्तू वाटत असल्याचे आढळले.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, कशी मानसिकता असते रेपिस्टची....

बातम्या आणखी आहेत...