आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी संवाद वाढवण्यासाठी दोन्ही कोरियांकडून पुढाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - कोरियन द्वीपकल्पातील तणाव कमी करण्यासाठी दक्षिण आणि उत्तर कोरिया गुरुवारी प्रत्यक्ष चर्चेसाठी एकत्र आले. या दुर्मिळ उच्चस्तरीय लष्करी वाटाघाटी आहेत. दोन्ही देशांदरम्यानच्या युद्धबंदी क्षेत्रात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पानमुनजोम या 
सीमेवरील गावात लष्करी बैठक घेण्यामध्ये उत्तर कोरियाला विशेष स्वारस्य दिसून आले.  


अमेरिकेशी संयुक्त युद्धाभ्यास बंद करावा

दक्षिण कोरियाने अमेरिकेशी संयुक्त युद्धाभ्यास बंद करावा याविषयी उ. कोरिया आग्रही राहिला आहे. यासंबंधी ठोस वचन दक्षिण कोरियाने द्यावे, अशी मागणीही उत्तर कोरिया करू शकतो. सिंगापूरमध्ये किम जोंग उन व अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेतही संयुक्त युद्धाभ्यासाचा मुद्दा उ. कोरियासाठी महत्त्वाचा होता. ट्रम्प यांनी युद्धाभ्यास होणार नाही, असे आश्वासनही दिले आहे. मात्र, द. कोरियाने ट्रम्प यांच्या वक्तव्याविषयी अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. उत्तरेशी यासंंबंधी भविष्यातही अधिक स्पष्टपणे चर्चा करू, असे संदिग्ध उत्तर द. कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने गुरुवारी दिले.  

 

तणाव आणि युद्धजन्य स्थिती टाळण्यासाठी चर्चा : द. कोरिया  

डिसेंबर २००७ मध्ये दक्षिण व उत्तर कोरियात लष्करी वाटाघाटी झाल्या होत्या. दोन्ही कोरियांत लष्करी चर्चेचे प्रसंग फार अल्प आहेत. सेऊलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, गुरुवारी होणाऱ्या वाटाघाटीत कोरियन द्वीपकल्पातील तणाव कमी करणे आणि युद्धजन्य परिस्थिती टाळणे याविषयी द. कोरिया बोलणार आहे. अमेरिकेशी असलेल्या सामरिक मैत्रीविषयीचा मुद्दा त्यांनी यातून वगळला आहे. द. कोरियाचे मेजर जनरल किम दो-ग्यून यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापनेसाठी आम्ही वाटाघाटी करत आहोत. उ. कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेफ्ट. जनरल अॅन इक सान करत आहेत. द. कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या चोई ह्युनसो यांनी लष्करी वाटाघाटीचा तपशील देणे टाळले.  

 

हे आहेत दोन्ही कोरियांदरम्यानचे महत्त्वाचे लष्करी मुद्दे  

- १९५०-५३ दरम्यान झालेल्या कोरियन युद्धातील बेपत्ता सैनिकांच्या तपशिलाचे आदान-प्रदान. यामुळेच दोन्ही कोरियांत कायमस्वरूपी वैमनस्य आजही टिकून आहे.  
- १९५३ मध्ये युद्धविराम कराराअंतर्गत युद्ध थांबले होते. शांती करार झाला नाही.  
- सातत्याने लष्करी बोलणी करण्याच्या गरजेवर दोन्ही कोरियांमध्ये मतभिन्नता आहे. द. कोरियाला सतत संवाद हवा आहे.  
- उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाइनची सुविधा सुरू करण्याचा पेच कायम आहे.  
- १९७० पासून द. कोरिया आणि अमेरिका सामरिक सहकारी आहेत, हे उ. कोरियाला अमान्य आहे.  

 

संपूर्ण अण्वस्त्रबंदीशिवाय उ. कोरियावरील निर्बंध हटवणार नाही : पॉम्पिआे  

उ. कोरियाने अण्वस्त्रबंदीचे वचन देणे, त्यासाठी पुरावे सादर करणे आणि त्याची संपूर्ण शहानिशा झाल्याशिवाय त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवले जाणार नाहीत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिआे यांनी ही स्पष्टोक्ती केली. अण्वस्त्रबंदी निकडीची असल्याची जाणीव सिंगापूर बैठकीत किम जोंग उन यांना करून देण्यात आली असल्याचे सेऊलमध्ये पॉम्पिआे यांनी सांगितले. द. कोरियाचे परराष्ट्रमंत्री कांग क्युंग वा यांच्यासोबत पॉम्पिआेंनी संयुक्त पत्रपरिषद घेतली. या वेळी कांग क्युंग म्हणाले की, अमेरिका-द. कोरिया सामरिक करार कायम राहील.उ. कोरियाने अण्वस्त्रबंदीचे वचन देणे, त्यासाठी पुरावे सादर करणे आणि त्याची संपूर्ण शहानिशा झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवले जाणार नाहीत.

 

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिआे यांनी ही स्पष्टोक्ती केली. अण्वस्त्रबंदी निकडीची असल्याची जाणीव सिंगापूर बैठकीत किम जोंग उन यांना करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  द. कोरियाचे परराष्ट्रमंत्री कांग क्युंग वा यांच्यासोबत पॉम्पिआेंनी संयुक्त पत्रपरिषद घेतली. या वेळी कांग क्युंग म्हणाले की, अमेरिका-द. कोरिया सामरिक करार कायम राहील.

 

 

बातम्या आणखी आहेत...