आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीखालचे वेगळे जग, PHOTOS पाहिल्याशिवाय बसणार नाही विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध शहर सिडनीपासून 1000 किमी अंतरावर वसलेल्या एका गावातील आहेत. या छोट्याशा गावात पब, प्राथमिक शाळापासून जनरल स्टोर आणि फ्लाइंग डॉक्टर्स क्लीनिक सर्वच सेवा उपलब्ध आहेत. 200 लोकांच्या या गावात नवीन व्यक्ती गेल्यास त्याला कुणीच दिसणार नाही. कारण, हे सगळेच जमीनीखाली राहतात. जमीनीखाली त्यांनी वेगळे जग तयार केले आहे. व्हाइट क्लीफ्स असे या गावाचे नाव आहे. 

 

- ऑस्ट्रेलियातील या गावात खाणकामाच्या काळातील मोठ-मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यांनी आता घरांचे स्वरुप घेतले आहे. या घरांमध्ये 200 हून अधिक गावकरी राहतात. 
- 1884 मध्ये Opal (मोल्यवान रत्न) असल्याचा शोध लागला होता. 1890 पर्यंत या ठिकाणी खाणकाम करणाऱ्यांची वस्ती झाली. 
- ऑस्ट्रेलियात उन्हाळ्यांमध्ये तापमान 50 डिग्री पर्यंत जातो. अशात लोकांना जमीनीखाली राहून गर्मीपासून दिलासा मिळतो. त्यामुळेच, मायनिंग बंद झाल्यानंतर लोकांनी या खड्ड्यांनाच घर केले आहे. 
- सोबतच बांधकामाचे साहित्य या ठिकाणी आणणे महागडे असल्याने त्याच खड्ड्यांची सजावट करून घर करणे परवडणारे होते. 
- त्यातही येथील जमीन पूर्णपणे सॅन्डस्टोनने बनलेली आहे. त्यामुळे, घरांमध्ये भेगा पडणे किंवा कोसळण्याची भिती नाही. 
- व्हिएतनाम युद्ध आणि अफगाणिस्तानातून परतलेले निवृत्त सैनिक अशा असंख्य लोकांसह माजी खाणकामगारांची या ठिकाणी घरे आहेत. तर काही आजही या ठिकाणी मोल्यवान धातूंचा शोध घेतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जमीनीखाली वसलेल्या या सुंदर घरांचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...