आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरच्या नाझी टॉर्चर कॅम्पचे Inside PHOTOS; येथेच मारले लाखो ज्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीत 1933 सत्ता काबिज करून अॅडोल्फ हिटलरने नाझीवादी साम्राज्याची स्थापना केली. ज्यूंचा सर्वनाश करण्यासाठी त्याने पोलंडमध्ये ऑशविझ कॅम्प उघडले. यानंतर इतर देशांमध्ये सुद्धा त्याने अशाच प्रकारचे कॅम्प लावून होलोकॉस्ट सुरू केला. सलग 6 वर्षे चाललेल्या अशा कॅम्पमध्ये 60 लाख ज्यूंचा नरसंहार करण्यात आला. 

 

दररोज जाळले जायचे 4700 मुडदे...

- पोलंडमध्ये असलेल्या जगातील सर्वात कुख्यात कॅम्पमध्ये धर्माच्या आधारे आणि शारीरिक अकार्यक्षमतेच्या बहाण्याने लाखो लोकांना डांबले जायचे.
- ज्यू, राजकीय विरोधक, आजारी, समलैंगिकांना यात ठेवून अमानवीय यातना दिल्या जायच्या. कडक बंदोबस्त असल्याने येथून पळ काढणे अशक्य होते.
- वृद्ध आणि आजारी लोकांना गॅस चेंबर्समध्ये टाकून मारले जात होते. तसेच येथे लावलेल्या 4 क्रिमेटोरियममध्ये दररोज 4700 मृतदेह जाळले जायचे. 
- ऑशविझ कॅम्पच्या शेजारील एक औद्योगिक वसाहत सुद्धा होती. त्या ठिकाणी याच कैद्यांना बळजबरी उपाशीपोटी काम करून घेतले जात होते. 
- 6 वर्षे चाललेल्या या होलोकॉस्टमध्ये 60 लाख ज्यूंचा नरसंहार करण्यात आला. त्यामध्ये 15 लाख लहान मुलांचाही समावेश होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, याच ऑशविझ कॅम्पचे आणखी काही आतील फोटो...

बातम्या आणखी आहेत...